मुंबई : उपनगरी रेल्वेमार्गावरील रूळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (दि.१९) मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे
कुठे? सीएसएमटी-विद्याविहार अप-डाऊन धीम्या मार्गावरकधी? सकाळी १०. ५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील तसेच भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकादरम्यान थांबून विद्याविहार स्टेशनवर योग्य डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.
हार्बर रेल्वे
कुठे? सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे अप- डाऊन हार्बर मार्गावरकधी? सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत
परिणाम : ब्लॉकदरम्यान सीएसएमटी /वडाळा रोड येथून वाशी/बेलापूर/ पनवेलकरीता आणि सीएसएमटी येथून वांद्रे/गोरेगावसाठी सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द असणार आहे तर पनवेल/बेलापूर/ वाशी आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटीसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे. ब्लॉक कालावधीत प्रवाशांच्या सुविधेसाठी पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.