मुंबई: मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवार मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. उपनगरीय रेल्वे मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीकरिता हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे तसेच सणासुदीच्या काळामुळे पश्चिम रेल्वेमार्गावर प्रवाशांना या रविवारी ब्लॉकपासून सुटका असणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान सकाळी १०:४० ते दुपारी ३:४० वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात जलद मार्गावरील लोकलची वाहतूक धीम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहे. परिणामी लोकल गाड्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने धावणार आहेत तसेच सीएसएमटी-दादर स्थानकातून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व मेल-एक्स्प्रेस कल्याण ते ठाणे-विक्रोळी स्थानकांदरम्यान पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गावरुन चालविण्यात येणार आहे.
हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. ब्लॉक दरम्यान वाशी ते पनवेल दरम्यानची लोकल वाहतूक बंद राहणार आहे तसेच ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल नेरुळ ते पनवेल दरम्यान बंद राहणार आहे. ब्लॉक काळात सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील.सुट्टीत मामाच्या गावाला जायचं कसं? रेल्वेचे तिकीट मिळेना...
दादर प्लॅटफॉर्म ४ वरील जिना १५ दिवस बंद
दादर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर असलेल्या फूट ओव्हर ब्रिज (एफओबी) दुरुस्तीसाठी १६ मार्च ते ३० एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या एफओबीचा उत्तरेकडील जिना बंद राहील. त्यामुळे या काळात प्रवाशांनी इतर एफओबी वापरावा, अशी विनंती ‘परे’ने केली आहे.