मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर ठाणे-कल्याण दरम्यान कल्याण दिशेकडील धिम्या मार्गावर तर, पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरीवली ते गोरेगावदरम्यान रविवारी १ मार्च रोजी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. परिणामी लोकल मार्गात बदल करण्यात आला आहे. तर हार्बर, ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द केल्या जातील. ट्रान्स मार्गावरील ठाणे-वाशी/नेरूळ लोकल सेवा सुरू असेल. सीएसएमटी ते मानखुर्द दरम्यान विशेष लोकल सोडल्या जातील.मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे-कल्याण दरम्यान कल्याण दिशेकडील धिम्या मार्गावर रविवारी सकाळी १०.४३ ते दुपारी ३.४६ पर्यंत ब्लॉक असेल. या वेळी धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर धावतील. या लोकल मुलुंड ते कल्याण दरम्यान ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण या स्थानकांवर थांबतील.हार्बर मार्गावरील पनवेल ते मानखुर्द दरम्यान दोन्ही दिशेकडील मार्गांवर ब्लॉक असेल. सीएसएमटीहून पनवेल/बेलापूर/वाशी दिशेकडे सकाळी ११.०६ ते दुपारी ४.३८ पर्यंत ब्लॉक असेल. पनवेल/बेलापूर/वाशीहून सीएसएमटीकडे सकाळी ११.०६ ते दुपारी ४.३८ वाजेपर्यंत तर, सीएसएमटी/वडाळ्याहून वाशी/बेलापूर/पनवेल दिशेकडे सकाळी १०.०३ ते दुपारी ४.०८ पर्यंत एकही लोकल धावणार नाही.ट्रान्स हार्बर मार्गावरून पनवेलहून ठाणे दिशेकडे जाणाऱ्या लोकल सकाळी १०.१२ ते दुपारी ४.२६ पर्यंत रद्द करण्यात येतील. ठाणेहून पनवेल दिशेकडे जाणाºया लोकल सकाळी ११.१४ ते दुपारी ४ वाजेपर्यंत तर, नेरूळ/बेलापूर ते खारकोपर दोन्ही दिशेकडे जाणाºया लोकल सकाळी ११.०२ ते दुपारी ४.४५ पर्यंत रद्द करण्यात येतील.पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरीवली ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असेल. सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत बोरीवली ते गोरेगाव यादरम्यान दोन्ही दिशेकडील धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर धावतील.