मुंबई - रेल्वे मार्गिका, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीसाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी (16 जून) मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड या स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर मेगाब्लॉक असेल. त्यामुळे धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर चालविण्यात येतील. परिणामी, विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर येथे थांबा नसेल. चर्चगेट ते मुंबई सेंट्रलंदरम्यान सर्व लोकल धिम्या मार्गावर धावतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
मध्य रेल्वे मार्गावर रविवारी माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर मेगाब्लॉक आहे. सकाळी १०.५७ मिनिटांपासून ते दुपारी ३.५२ वाजेपर्यंत कल्याण दिशेकडील लोकल जलद मार्गावर धावतील. धिम्या मार्गावरील लोकल माटुंगा ते मुलुंडदरम्यान जलद मार्गावर धावतील. त्या सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड येथे थांबतील. त्यानंतर, माटुंगा स्थानकावरून धिम्या मार्गावर धावतील. विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर येथे जलद मार्गाच्या फलाटाअभावी मेगाब्लॉकच्या वेळी लोकल येथे थांबा घेणार नाहीत.सकाळी १०.५४ ते दुपारी ३.०६ वाजेपर्यंत कल्याणहून सीएसएमटी दिशेकडे सुटणाऱ्या जलद लोकलना नियमित थांब्यासह दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला येथेही थांबा असेल. ब्लॉक काळात सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून कल्याणकडे जाणाऱ्या जलद लोकलना नियमित थांब्यासह घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा या स्थानकांवर थांबा देण्यात येईल.
चर्चगेट ते मुंबई सेंट्रल जम्बोब्लॉक
चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत दोन्ही दिशेकडे जाणाºया जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सर्व लोकल धिम्या मार्गावर धावतील. ब्लॉकमुळे काही लोकल रद्द करण्यात येतील.हार्बर मार्गावरील लोकल रद्द
हार्बर मार्गावरील सीएसएमटीहून चुनाभट्टी, वांद्रे दिशेकडे जाणाºया सकाळी ११.४० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंतच्या सर्व लोकल रविवारी रद्द करण्यात आल्या आहेत. याचप्रमाणे, रविारी सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत चुनाभट्टी, वांद्रेहून सीएसएमटी दिशेकडे एकही लोकल धावणार नाही. सीएसएमटी आणि वडाळा रोड येथून वाशी, बेलापूर, पनवेलसाठी सुटणाºया लोकल रविवारी सकाळी ११.३४ ते दुपारी ४.२३ वाजेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. याचप्रमाणे, सकाळी ९.५६ ते दुपारी ४.१६ वाजेपर्यंत सीएसएमटीहून वांद्रे, गोरेगावसाठी, तसेच सकाळी ९.५३ ते दुपारी २.४४ वाजेपर्यंत वाशी, बेलापूर, पनवेलहून सीएसएमटीसाठी एकही लोकल धावणार नाही. सकाळी १०.४५ ते दुपारी ४.५८ वाजेपर्यंत वांद्रे, अंधेरी, गोरेगावहून सीएसएमटी दिशेकडे जाणाºया सर्व लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक काळात पनवेल आणि कुर्ल्याहून प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष लोकल चालविण्यात येतील. कुर्ला स्थानकातून फलाट क्रमांक ८ वरून ही सोय उपलब्ध असेल.