Join us

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 2:15 AM

हार्बर रेल्वे मार्ग कुर्ला-वाशी दरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहील.

मुंबई : सिग्नल प्रणालीच्या दुरुस्तीसाठी आणि इतर अभियांत्रिकी कामांसाठी रविवार, २२ एप्रिल रोजी रेल्वे प्रशासनाने तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घोषित केला आहे.मध्य रेल्वेच्या मुलुंड-माटुंगा अप धिम्या मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत, पश्चिम रेल्वेच्या बोरीवली-गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बर रेल्वे मार्ग कुर्ला-वाशी दरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहील.मध्य रेल्वे मार्गावर सकाळी १०.३७ ते दुपारी ४.०२ वाजेपर्यंत कल्याणहून सुटणाऱ्या सर्व अप धिम्या लोकल मुलुंड ते माटुंगादरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. दरम्यान, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, शीव येथेही थांबतील. सीएसएमटीहून सुटणाºया डाऊन जलद व अर्ध जलद लोकल सकाळी १०.१६ ते दुपारी २.५४ दरम्यान घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा स्थानकांवर थांबतील.पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक काळात अप आणि डाऊन धिम्या लोकल बोरीवली ते गोरेवाव दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरून धावतील. बोरीवली स्थानकाच्या फलाट क्रमांक १, २, ३ आणि ४ वर लोकल थांबणार नाहीत व प्रस्थानही करणार नाहीत.सीएसएमटी ते कुर्ला विशेष लोकलच्हार्बर रेल्वे मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत कुर्ला-वाशी दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि वाशी-पनवेल दरम्यान विशेष लोकल सेवा चालविण्यात येईल. ब्लॉक काळात वाशी ते कुर्ला दरम्यान लोकल फेºया उपलब्ध नसतील.

टॅग्स :मुंबई