आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 05:15 AM2018-05-13T05:15:38+5:302018-05-13T05:15:38+5:30

रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर, सिग्नल, ओव्हरहेड वायरसह तांत्रिक कामांसाठी पश्चिम रेल्वे मार्गावरील

Mega Blocks on all three routes today | आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

Next

मुंबई : रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर, सिग्नल, ओव्हरहेड वायरसह तांत्रिक कामांसाठी पश्चिम रेल्वे मार्गावरील माहिम जंक्शन ते अंधेरी अप आणि डाउन हार्बर मार्गावर, मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाणे अप धिम्या मार्गावर आणि हार्बरवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते चुनाभट्टी, वांद्रे अप आणि डाउन मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेवर माहिम जंक्शन ते अंधेरी अप आणि डाउन हार्बर मार्गावर रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या वेळेत मेगा ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकदरम्यान अंधेरी हार्बर मार्गावरील फलाट क्रमांक १ आणि २ वरील मध्य रेल्वेवरून जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तसेच ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवरील अप आणि डाउन लोकल ही रद्द करण्यात आल्या आहेत. कल्याण ते ठाणे अप धिम्या मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० या वेळेत ब्लॉक घेण्यात आला आहे. कल्याणहून सुटणाºया अप जलद मार्गावरील गाड्या सकाळी १०.४८ ते दुपारी ४.१४ दरम्यान कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील, तसेच मुलुंड स्थानकावर अप धिम्या मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील. ब्लॉक काळात ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर धिम्या सेवा उपलब्ध नाहीत. उर्वरित मार्गावरील प्रवाशांना ठाणे, दिवा, डोंबिवली आणि कल्याण या स्थानकावरून प्रवास करण्याची परवानगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.०५ ते दुपारी २.५४ या काळात सुटणाºया डाउन जलद गाड्या घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा या स्थानकांवर थांबतील. कल्याणपासून सुटणाºया सकाळी ११.२३ ते दुपारी ४.०२ या वेळेत दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकावरही थांबतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणाºया गाड्या कल्याण स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावरून धावतील. सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत मुंबईत येणाºया सर्व डाउन आणि अप धिम्या सेवा दहा मिनिटांपर्यंत उशिराने पोहोचतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान अप मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० आणि डाउन मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० या वेळेत ब्लॉक घेण्यात येईल, तर चुनाभट्टी/वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान हार्बरच्या दिशेने सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० या वेळेत ब्लॉक घेतला जाईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड ते वाशी डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.३४ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत आणि डाउन हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.५६ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत एकही लोकल धावणार नाही.

Web Title: Mega Blocks on all three routes today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.