तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 06:59 AM2018-06-24T06:59:54+5:302018-06-24T07:00:37+5:30

मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे या तीनही उपनगरीय रेल्वे मार्गांवर रविवार, २४ जूनला सकाळी ११.१० ते दु. ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

Mega Blocks on all three routes today | तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

googlenewsNext

मुंबई : मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे या तीनही उपनगरीय रेल्वे मार्गांवर रविवार, २४ जूनला सकाळी ११.१० ते दु. ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा अप धिम्या मार्गावर हा ब्लॉक असेल. त्यामुळे अप धिम्या मार्गावरील वाहतूक अप जलद मार्गावरून वळवण्यात येईल. या कालावधीत नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत. ठाण्याहून सुटणाऱ्या सर्व अप धिम्या लोकल सकाळी १०.३७ ते दु. ४.०२ वाजेपर्यंत अप जलद मार्गावर मुलुंड ते माटुंगामध्ये चालवल्या जातील. त्यांना मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, सायन स्थानकात थांबे दिले जातील. त्यानंतर या लोकल पुन्हा माटुंग्यानंतर अप मार्गावर वळवल्या जातील.
सीएसएमटी येथून सुटणाºया सर्व जलद, अर्धजलद लोकल सकाळी १०.१६ ते दुपारी २.५४ वाजेपर्यंत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा स्थानकावर थांबतील. त्यामुळे नेहमीच्या नियोजित वेळापत्रकापेक्षा दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावतील. मेगाब्लॉकच्या कामामुळे कल्याण येथून सुटणाºया सर्व अप जलद, अर्धजलद लोकल या रविवारी सकाळी ११.०४ ते दु. ३.०६ या वेळेत नियोजित स्थानकांसह दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकातही थांबतील.
पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली
ते गोरेगाव स्थानकांदरम्यान
सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत देखभाल-दुरुस्तीच्या विविध कामांसाठी अप आणि डाऊन
धिम्या मार्गावर मेगाब्लॉक असेल.
या काळात बोरीवली ते गोरेगाव दरम्यान धिम्या मार्गावर धावणाºया लोकल जलद मार्गावरून धावतील. मेगाब्लॉक दरम्यान बोरीवली स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक १, २,
३ आणि ४ वरून एकही लोकल धावणार नसल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.

हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. सीएसएमटीहून सकाळी ११.३४ वाजल्यापासून ते दुपारी ३.३९ वाजेपर्यंत वाशी, बेलापूर, पनवेल येथे जाणाºया तसेच पनवेल, बेलापूर, वाशीहून सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ वाजेपर्यंत सीएसएमटी येथे जाणाºया सर्व उपनगरीय सेवा रद्द राहतील. मेगाब्लॉक काळात सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल या स्थानकांदरम्यान विशेष लोकल सेवा सुरू ठेवण्यात येईल. तसेच या मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करण्याची मुभा आहे.

मेल, एक्स्पे्रसला लेटमार्क
मेगाब्लॉक काळात दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे थांबणाºया सर्व मेल आणि एक्स्प्रेस निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

Web Title: Mega Blocks on all three routes today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.