Join us

मध्य, हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 4:54 AM

अभियांत्रिकी कामांसाठी रेल्वेने मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवार, ११ मार्च रोजी मेगाब्लॉक घोषित केला आहे. मध्य रेल्वे मार्गावर मुलुंड-माटुंगा अप जलद मार्गावर सकाळी १०.३७ ते सायंकाळी ४.१५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल.

मुंबई  - अभियांत्रिकी कामांसाठी रेल्वेने मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवार, ११ मार्च रोजी मेगाब्लॉक घोषित केला आहे. मध्य रेल्वे मार्गावर मुलुंड-माटुंगा अप जलद मार्गावर सकाळी १०.३७ ते सायंकाळी ४.१५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. तर हार्बर रेल्वे मार्गावर सकाळी ११.१०. ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-वाशी/बेलापूर/पनवेल आणि सकाळी १०.४५ ते सायं. ५.०९ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - वांद्रे/अंधेरी दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे.मध्य रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी १०.३७ ते दुपारी ३.५६ वाजेपर्यंत कल्याणहून सुटणाºया सर्व अप जलद लोकल दिवा आणि परळ स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर चालविण्यात येतील. दरम्यान, या लोकल सर्व स्थानकांवर थांबतील व शेवटच्या स्थानकावर २० मिनिटे उशिराने पोहोचतील. सकाळी १०.०५ ते दुपारी ३.२२ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाºया डाऊन जलद लोकल निर्धारित हॉल्टव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकावर थांबतील.हार्बर रेल्वेवर सकाळी ११.३४ ते सायं. ४.४७ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड ते वाशी/बेलापूर/पनवेलला जाणाºया सर्व लोकल, तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटून वांद्रे/अंधेरीला जाणाºया सर्व लोकल बंद राहतील. सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० दरम्यान पनवेल/बेलापूर/वाशीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाºया सर्व लोकल, तसेच सकाळी १०.४५ ते सायं. ५.०९ दरम्यान अंधेरी/वांद्रेहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाºया सर्व लोकल बंद राहतील.पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना दिलासाब्लॉक काळात कुर्ला स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वरून पनवेल-कुर्ला विशेष लोकल फेºया चालविण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार नसल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाºयांना दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :मुंबई लोकलमुंबई