Join us

प्रवाशांचे मेगा हाल

By admin | Published: October 24, 2016 4:44 AM

दिवा स्थानकात जलद गाड्या थांबवण्यासाठी घेतलेल्या शेवटच्या ब्लॉकमुळे जलदगती मार्ग नऊ तास बंद असल्याने प्रवाशांना फटका बसला.

ठाणे : दिवा स्थानकात जलद गाड्या थांबवण्यासाठी घेतलेल्या शेवटच्या ब्लॉकमुळे जलदगती मार्ग नऊ तास बंद असल्याने प्रवाशांना फटका बसला. दिवाळीच्या खरेदीसाठी कुटुंबासह बाहेर पडलेल्यांचे यात अतोनात हाल झाले. मुंबईकडे जाणाऱ्या जलद लोकलच्या थांब्याचे काम रविवारी पूर्ण करण्यात आले. त्यासाठी कल्याण ते ठाणेदरम्यान जलद मार्गावरील लोकल रद्द करून धिम्या मार्गवर वळवल्याने ठाणे-कल्याणदरम्यान फलाटांवर प्रचंड गर्दी होती. धिम्या मार्गावरील वाहतूकही त्यामुळे कोलमडली. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ दरम्यान हा विशेष ब्लॉक होता. कल्याणहून सीएसटीला जाणाऱ्या जलद लोकल सकाळी ८.३३ ते सायंकाळी ५.४५ पर्यंत कल्याण ते ठाणेदरम्यान धिम्या मार्गावर धावत होत्या. सीएसटीहून सुटणाऱ्या जलद लोकल सकाळी ८.२९ ते ४.४५ पर्यंत ठाणे-कल्याणदरम्यान धिम्या मार्गावरून धावत होत्या. काही लोकलसह सिंहगड एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या. परिणामी, धिम्या मार्गावरील वाहतूक उशिराने होत होती. (प्रतिनिधी)