मुंबई महापालिकेत लवकरच मेगा भरती, लिपिकांची ८१० पदे भरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 07:16 AM2020-01-22T07:16:00+5:302020-01-22T07:17:07+5:30

महापालिकेत चतुर्थ श्रेणीतील कामगार आणि कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीनंतर आता लवकरच कार्यकारी साहाय्यक पदासाठी मेगा भरती होणार आहे.

Mega recruitment in Mumbai municipal corporation will soon, fill 810 posts of clerk | मुंबई महापालिकेत लवकरच मेगा भरती, लिपिकांची ८१० पदे भरणार

मुंबई महापालिकेत लवकरच मेगा भरती, लिपिकांची ८१० पदे भरणार

Next

मुंबई : महापालिकेत चतुर्थ श्रेणीतील कामगार आणि कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीनंतर आता लवकरच कार्यकारी साहाय्यक पदासाठी मेगा भरती होणार आहे़ ८१० रिक्त पदांसाठी आॅनलाइन परीक्षा घेऊन ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे़ या पदासाठी सुमारे एक लाखाहून अधिक अर्ज येण्याची शक्यता आहे. 

कार्यकारी साहाय्यक वर्गासाठी (लिपिक) एकूण ५२५५ पदे आहेत. त्या पदांपैकी सरळसेवा पद्धतीने ३२२१ पदे भरण्यात येणार आहेत़ त्यातील सरळसेवेपैकी रिक्त असलेली ८१० पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. ही पदे भरण्यासाठी महाआॅनलाइन लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीच्या माध्यमातून या पदांची भरती सरळसेवेत करण्यासाठी आॅनलाइन अर्ज मागवणे, संगणक ज्ञानाची परीक्षा आणि बहुपर्यायी वस्तुनिष्ठ आॅनलाइन परीक्षेसह इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाची आॅनलाइन व्यावसायिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे.

असा कराल अर्ज
सर्व उमेदवारांचे  ऑनलाइन पद्धतीचे अर्ज मागवण्यासाठी अर्जाचा नमुना महाऑनलाइनच्या महा रिक्रुटमेंट या संकेतस्थळावर अपलोड केले जाणार आहे. याची लिंक महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करून आॅनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

राज्य शासनाच्या संस्थांची माघार
या भरतीसाठी उमेदवारांची इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाची व्यावसायिक चाचणी परीक्षा होणार आहे. राज्य सरकारच्या महाआयटी आणि आयबीपीएस या नामांकित संस्थांनी ही परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे महाआॅनलाइन लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. महाआॅनलाइन ही सरकारी कंपनी भरती प्रक्रिया राबवणार असल्याने जाहिरातीद्वारे निविदा मागवण्याची अट शिथिल करण्यात आली
आहे.

परीक्षेसाठी शुल्क
या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकडून प्रत्येकी ९०० रुपये तर मागासवर्गीय व इतर मागास प्रवर्गातील उमदेवारांकडून प्रत्येकी ७०० रुपये शुल्क घेतले जाणार आहे़
 

Web Title: Mega recruitment in Mumbai municipal corporation will soon, fill 810 posts of clerk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.