Join us

रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2023 9:22 AM

काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी ५ मार्च, २०२३ रोजी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी ५ मार्च, २०२३ रोजी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

मध्य रेल्वे : कुठे- ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन पाचवी सहावी मार्गिकेवर, कधी- सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत परिणाम- या ब्लॉकदरम्यान ट्रेन क्रमांक १२१२६ पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस कर्जत-कल्याण मार्गे वळविली जाणार आहे.  

हार्बर रेल्वे : कुठे-  कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर, कधी - सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत, परिणाम - सीएसएमटी येथून  पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/बेलापूर/पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या सेवा रद्द राहतील. 

पश्चिम रेल्वेवर : कुठे- बोरीवली ते भाईंदर अप आणि डाऊन जलद मार्गावर, कधी - शनिवारी रात्री ११.४५ ते पहाटे ४.४५ वाजेपर्यंत, परिणाम - अप आणि डाऊन जलद मार्गांवरील लोकल सेवा विरार ते वसई रोड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गांवर वळविण्यात येणार आहे. या लॉकमुळे अप आणि डाऊन दिशेच्या काही गाड्या रद्द होतील.

टॅग्स :मध्य रेल्वे