Mumbai Train Status: उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 06:55 IST2019-08-17T06:36:53+5:302019-08-17T06:55:49+5:30
Mega Block Status: पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल, मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंडदरम्यान रविवारी ब्लॉक घेण्यात येईल.

Mumbai Train Status: उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल, मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंडदरम्यान रविवारी ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकवेळी हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी, बेलापूर, पनवेलदरम्यानच्या लोकल रद्द केल्या जातील.
मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंडदरम्यान कल्याण दिशेकडील जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान सकाळी ९.५३ वाजेपासून ते दुपारी २.४२ वाजेपर्यंत सीएसएमटीवरून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सर्व लोकल माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावरून धावतील. या लोकल यादरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील.
हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशीदरम्यान दोन्ही दिशेकडील लोकल फेºया सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत रद्द करण्यात येतील. सकाळी १०.३४ वाजेपासून ते दुपारी ३.०८ वाजेपर्यंत सीएसएमटीहून वाशी / बेलापूर / पनवेलसाठी सुटणाºया लोकल रद्द करण्यात येतील. सकाळी १०.२१ वाजेपासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत पनवेल / बेलापूर / वाशीहून सीएसएमटी दिशेकडे एकही लोकल धावणार नाही. तर, सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल मार्गावर प्रवाशांच्या सुविधेसाठी विशेष लोकल चालविण्यात येतील.
पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेकडील जलद मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत जम्बोब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकदरम्यान जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावर चालविण्यात येतील. ब्लॉकमुळे दोन्ही दिशेकडील काही लोकल रद्द करण्यात येईल.