रविवारी असणार मेगाब्लॉक; हार्बर मार्गावरील अत्यावश्यक लोकलसेवा राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 06:28 PM2020-08-28T18:28:49+5:302020-08-28T18:29:16+5:30

ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील व निर्धारित थांब्यांवर  थांबतील.

Megablock to be on Sunday; Essential local services on Harbor Road will remain closed | रविवारी असणार मेगाब्लॉक; हार्बर मार्गावरील अत्यावश्यक लोकलसेवा राहणार बंद

रविवारी असणार मेगाब्लॉक; हार्बर मार्गावरील अत्यावश्यक लोकलसेवा राहणार बंद

Next

डोंबिवली:  मध्य रेल्वे रविवारी विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी आपल्या उपनगरी भागांवर मेगा ब्लॉक संचालीत करणार आहे.
ठाणे आणि कल्याण दरम्यान  अप व डाउन जलद मार्गावर सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.३० ते दुपारी २.१७  या वेळेत सुटणा-या डाउन जलद विशेष सेवा ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील व निर्धारित थांब्यांवर थांबतील.

कल्याण येथून सकाळी ९.४७ ते दुपारी २.४७ दरम्यान सुटणारी  जलद विशेष सेवा कल्याण व ठाणे दरम्यान अप धिम्या मार्गावर  वळविण्यात येतील व निर्धारित थांब्यांवर  थांबतील तसेच ठाणे येथून अप फास्ट मार्गावर वळविण्यात येतील व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.  

पनवेल-वाशी अप व डाउन  मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० दरम्यान सकाळी १०.३० ते दुपारी ३.३५ या वेळेत पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणा-या हार्बर मार्गावरील विशेष सेवा बंद राहतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.३० ते दुपारी ३.०० या वेळेत सुटणा-या पनवेलसाठी डाउन  हार्बर मार्गावरील विशेष सेवा बंद राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-वाशी- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विभागात विशेष लोकल गाड्या धावतील. पायाभूत सुविधा व सुरक्षिततेसाठी हे देखभाल करणारे मेगा ब्लॉक आवश्यक असल्याचे शुक्रवारच्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.

Web Title: Megablock to be on Sunday; Essential local services on Harbor Road will remain closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.