डोंबिवली: मध्य रेल्वे रविवारी विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी आपल्या उपनगरी भागांवर मेगा ब्लॉक संचालीत करणार आहे.ठाणे आणि कल्याण दरम्यान अप व डाउन जलद मार्गावर सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.३० ते दुपारी २.१७ या वेळेत सुटणा-या डाउन जलद विशेष सेवा ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील व निर्धारित थांब्यांवर थांबतील.
कल्याण येथून सकाळी ९.४७ ते दुपारी २.४७ दरम्यान सुटणारी जलद विशेष सेवा कल्याण व ठाणे दरम्यान अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील व निर्धारित थांब्यांवर थांबतील तसेच ठाणे येथून अप फास्ट मार्गावर वळविण्यात येतील व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.
पनवेल-वाशी अप व डाउन मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० दरम्यान सकाळी १०.३० ते दुपारी ३.३५ या वेळेत पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणा-या हार्बर मार्गावरील विशेष सेवा बंद राहतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.३० ते दुपारी ३.०० या वेळेत सुटणा-या पनवेलसाठी डाउन हार्बर मार्गावरील विशेष सेवा बंद राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-वाशी- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विभागात विशेष लोकल गाड्या धावतील. पायाभूत सुविधा व सुरक्षिततेसाठी हे देखभाल करणारे मेगा ब्लॉक आवश्यक असल्याचे शुक्रवारच्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.