Join us

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 4:10 AM

मुंबई : देखभाल आणि दुरुस्ती कामांसाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, तर पश्चिम रेल्वे ...

मुंबई : देखभाल आणि दुरुस्ती कामांसाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, तर पश्चिम रेल्वे मार्गावरील रविवारी मेगाब्लॉक नसणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्या विहारदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते संध्याकाळी ३.५५ पर्यंत दरम्यान मेगाब्लॉक असणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.३६ या वेळेत सुटणारी डाऊन धीम्या सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्या विहारदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवली जाईल आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन, कुर्ला या स्थानकांवर थांबतील. घाटकोपरहून सकाळी १०.४६ ते दुपारी ३.२६ पर्यंत सुटणारी अप धीम्या सेवा विद्या विहार और छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येणार असून या कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ, भायखळा या स्थानकांवर थांबतील.

हार्बर मार्गावर मानखुर्द ते नेरूळदरम्यान सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १०.१८ ते दुपारी ३.२८ यावेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्सवरून वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या गाड्या व पनवेल /बेलापूर /वाशी येथून सकाळी १०.४५ ते दुपारी ३.४१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स येथे जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. याकाळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्ददरम्यान विशेषसेवा चालविण्यात येणार आहे.