रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 09:15 PM2020-07-31T21:15:10+5:302020-07-31T21:15:36+5:30
यावेळी कोपर ते डोंबिवली स्थानकांदरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा जुना वापरात नसलेला पाईपलाईन पूल पाडण्यात येणार आहे.
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर पायाभूत कामासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी कोपर ते डोंबिवली स्थानकांदरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा जुना पाईपलाईन पुलाचे पाडकाम केले जाणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील दिवा ते कल्याण यांच्या दरम्यान विशेष ब्लॉक असणार आहे. सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या ५ आणि ६ व्या मार्गिकेवर रविवारी दुपारी १.२० ते सायंकाळी ६.५० पर्यंत आणि कल्याण दिशेकडील जलद, आणि दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावर दुपारी ३.२० ते दुपारी ४.५० पर्यंत ब्लॉक असेल. यावेळी कोपर ते डोंबिवली स्थानकांदरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा जुना वापरात नसलेला पाईपलाईन पूल पाडण्यात येणार आहे.
सकाळी ११.०५ ते दुपारी २.१७ या दरम्यान सीएसएमटीहून कल्याण दिशेकडील जलद विशेष सेवा ठाणे ते कल्याण दरम्यान धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. सकाळी ११.४७ ते सायंकाळी ६.३९ दरम्यान कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद विशेष सेवा कल्याण व ठाणे दरम्यान धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. दिवा आणि कल्याण दरम्यान दुपारी ३.२० ते दुपारी ४.५० दरम्यान सर्व उपनगरी विशेष सेवा बंद राहतील.
हार्बर मार्गावरील सेवा बंद
सीएसएमटी ते चुनाभट्टी हार्बर मार्गावर सकाळी ११.२५ ते सायंकाळी ४.२५ पर्यंत
चुनाभट्टी ते सीएसएमटी हार्बर मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत
सीएसएमटी ते पनवेल सकाळी ११.१५ ते संध्याकाळी ४.०० पर्यंत
पनवेल ते सीएसएमटी सकाळी ९.४५ ते दुपारी २.४१ पर्यंत
ब्लॉक कालावधीत विशेष लोकल सेवा पनवेल - कुर्ला - पनवेल या दरम्यायान चालविण्यात येतील.