मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2024 06:00 IST2024-06-16T05:59:46+5:302024-06-16T06:00:31+5:30
ब्लॉक कालावधीत सीएसएमटी- कुर्ला आणि पनवेल-वाशीदरम्यान विशेष उपनगरीय गाड्या चालविल्या जातील.

मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी ११:०५ ते दुपारी ३:०५ वाजेपर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असून, अप आणि डाऊन हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकादरम्यान सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० पर्यंत ब्लॉक असणार आहे.
सीएसएमटी येथून सकाळी १०:२५ ते दुपारी २:४५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येईल. माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यानच्या नियोजित थांब्यांवर थांबतील. १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यापलीकडे जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. पनवेल-बेलापूर- वाशीसाठी सकाळी १०:३४ ते दुपारी ३:३६ वाजेपर्यंत सीएसएमटीकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी १०:१६ ते दुपारी ३:४७ वाजेपर्यंत सुटणाऱ्या पनवेल-बेलापूर- वाशीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहील.
ब्लॉक कालावधीत सीएसएमटी- कुर्ला आणि पनवेल-वाशीदरम्यान विशेष उपनगरीय गाड्या चालविल्या जातील.
डाऊन धिम्या लाइनवर
ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल बदलापूर आहे. सीएसएमटी येथून ही लोकल सकाळी १०:२० वाजता
सुटणार आहे.
-ब्लॉकनंतर पहिली लोकल बदलापूर आहे. सीएसएमटी येथून ही लोकल दुपारी ३ वाजता सुटणार आहे.
डाऊन हार्बर मार्गावर
- ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल पनवेल आहे. सीएसएमटी येथून ही लोकल सकाळी १०:१८ वाजता सुटणार आहे. ■ ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल आहे. सीएसएमटी येथून ही लोकल दुपारी ३:४४ वाजता सुटणार आहे.
अप हार्बर मार्गावर
- सीएसएमटीसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सकाळी १०:०५ वाजता पनवेल येथून सुटणार आहे.
- सीएसएमटीसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल येथून दुपारी ३:४५ वाजता सुटणार