मुंबई : रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी २२ ऑक्टोबर २०२३ रोजी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे
- कुठे - ठाणे- कल्याण पाचवी सहावी मार्गिकेवर
- कधी - मध्य रात्री १ ते पहाटे ४ वाजेपर्यंत
- परिणाम - या ब्लॉकदरम्यान मुंबईकडे येणाऱ्या मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. तर मुंबईतून जाणाऱ्या मेल- एक्सप्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. या दोन्ही दिशेच्या मेल- एक्सप्रेस गाड्या १० ते १५ मिनिटांच्या विलंबाने गंतव्यस्थानी पोहोचतील.
हार्बर मार्गावर
- कुठे - मानखुर्द ते नेरुळ अप- डाऊन हार्बर मार्गावर
- कधी - सकाळी ११.१५ ते सायंकाळी ४.१५ पर्यंत
- परिणाम - या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी /वडाळा रोड येथून वाशी/बेलापूर/पनवेल करिता आणि सीएसएमटी येथून वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द असणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते मानखुर्द दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत ट्रान्स हार्बर मार्गावर आणि मुख्य मार्गावर प्रवास करण्याची परवानगी असणार आहे.
पश्चिम रेल्वे
- कुठे - गोरेगांव ते बोरिवली अप- डाऊन जलद मार्गावर
- कधी - सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यत
- परिणाम- या ब्लॉकदरम्यान अप-डाउन जलद मार्गावरील लोकल सेवा गोरेगांव ते बोरिवली स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. बोरिवलीहून सुटणाऱ्या काही लोकल गाड्या गोरेगाव स्थानकापर्यंत धावतील. ब्लॉक दरम्यान काही लोकल सेवा रद्द असणार आहे.