मुंबई : अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी, ९ जुलै रोजी मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विद्याविहार-ठाणे यादरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या लाइनवर सकाळी ११:३० ते दुपारी ३:३० पर्यंत मेगाब्लॉक असेल.
ब्लॉक कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाऱ्या, पोहोचणाऱ्या डाउन आणि अप मेल, एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि विद्याविहारदरम्यान डाउन आणि अप जलदमार्गावर वळवण्यात येतील. कुर्ला-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११:१० ते सायंकाळी ४:१० पर्यंत मेगा ब्लॉक असेल. या कालावधीत दोन्ही दिशेकडील हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.
विशेष लोकल ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - कुर्ला आणि पनवेल - वाशी या भागांत विशेष लोकल चालविण्यात येतील.
कुठे प्रवासाची परवानगी ?हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे - वाशी, नेरुळ मार्गे ट्रान्सहार्बर मार्गावरून सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल.