मेगाब्लॉग! महत्त्वाचे काम असेल, तरच रविवारी घराबाहेर पडा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 01:28 PM2023-08-05T13:28:45+5:302023-08-05T13:29:36+5:30
मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे कुठे?
माटुंगा ते ठाणे अप डाऊन धिम्या मार्गावर.
■ कधी? सकाळी ८:३० ते दुपारी १:३० वाजेपर्यंत.
■ परिणाम या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्याा डाऊन मार्गावरील धिम्या लोकल जलद मार्गावर वळविण्यात येतील. सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, ठाणे स्थानकांवर थांबतील. कल्याणहून सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील गाड्या ठाणे स्थानकावर अप जलद मार्गावर जातील. माटुंगा स्थानकावर धिम्या मार्गावर वळविण्यात येतील.
हार्बर रेल्वे
■ कुठे? कुर्ला- वाशी अप आणि डाउन मार्गावर.
कधी? सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० पर्यंत.
• परिणाम पनवेलहून सीएसएमटीकडे जाणाया अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून वाशी/ पनवेल/ बेलापूरकडे जाणाया डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते कुर्ला, पनवेल आणि वाशीदरम्यान विशेष लोकल सेवा चालविल्या जातील.
पश्चिम रेल्वे
कुठे? मरिन लाइन्स माहीम अप आणि डाऊन धिम्या मार्गावर.
कधी? सकाळी १०:३५ ते दुपारी ३:३५ वाजेपर्यंत.
परिणाम: मरिन लाइन्स आणि माहीम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर 'चालविल्या जातील. या लोकल सेवा महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकावर थांबणार नाहीत. लोअर परळ आणि माहीम जंक्शन येथे सर्व धिम्या सेवा बंद केल्या जातील