Join us  

पनवेल-नेरूळ मार्गावर मेगाब्लॉक

By admin | Published: May 24, 2014 12:23 AM

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील विद्याविहार-भायखळा स्थानकांदरम्यान अप धीम्या गतीसह हार्बरच्या पनवेल-नेरूळ स्थानकांदरम्यान रविवारचा मेगाब्लॉक आहे

ठाणे : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील विद्याविहार-भायखळा स्थानकांदरम्यान अप धीम्या गतीसह हार्बरच्या पनवेल-नेरूळ स्थानकांदरम्यान रविवारचा मेगाब्लॉक आहे. हा ब्लॉक स. ११.१५ ते दु. ३.१५ वा.पर्यंतच्या कालावधीत असेल. त्यामुळे मुख्य मार्गावरील सर्व लोकल ब्लॉकच्या कालावधीत अप जलद गती मार्गावरून धावतील. त्या लोकल भायखळ्यानंतर पुन्हा धीम्या गती मार्गावरून अपमार्गे धावतील. जलद गती मार्गावरून लोकल धावणार असल्या तरीही त्या सर्व लोकल कुर्ला, शीव, दादर, परळ या सर्व स्थानकांत थांबणार असल्याचे जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले. या कालावधीत अप दिशेवर करी रोड, चिंचपोकळी स्थानकांदरम्यान लोकल उपलब्ध नसतील. त्यामुळे या स्थानकात येणार्‍या प्रवाशांना आहे त्याच तिकीट/पासावर भायखळा स्थानकात जाऊन डाऊनमार्गे प्रवासाची मुभा देण्यात आली असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. हार्बर मार्गावर पनवेल-नेरूळ स्थानकांदरम्यान अप/डाऊन दोन्ही दिशांवर मेगाब्लॉक असल्याने स. ११ ते दु. ३ या वेळेत तेथे लोकल सेवा ब्लॉकच्या कालावधीत रद्द करण्यात आल्या आहेत. ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सेवाही स. ११.१९ ते दु. ३.१९ या कालावधीत ठाणे ते पनवेल आणि पनवेल ते नेरूळ मार्गावर तर पनवेल-अंधेरी लोकल सेवाही या कालावधीत रद्द केल्या आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी सीएसटी-नेरूळ तसेच ट्रान्स-हार्बरच्या ठाणे-नेरूळ मार्गावर विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)