मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 06:51 AM2019-10-05T06:51:46+5:302019-10-05T06:51:59+5:30

मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड धिम्या मार्गावर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार असल्याने विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर स्थानकावर लोकलला थांबा नसेल.

Megablock on Sunday on the Central, Harbor Railway, giving relief to Western Railway passengers | मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

googlenewsNext

मुंबई : मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड धिम्या मार्गावर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार असल्याने विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर स्थानकावर लोकलला थांबा नसेल. याशिवाय हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक घेण्यात येईल. मात्र, पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी रात्री ब्लॉक घेण्यात येणार असल्याने रविवारी दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार नाही. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळेल.

मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान कल्याण दिशेकडील धिम्या मार्गावर रविवार, ६ आॅक्टोबर रोजी सकाळी ११.२० ते दुपारी ३.५० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत माटुंगा ते मुलुंड दरम्यान कल्याण दिशेकडे जाणाऱ्या धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून धावतील. सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड या स्थानकांवर त्या थांबणार नाहीत. तर, विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर येथे जलद मार्गावरील फलाट नसल्याने रविवारी तेथे लोकल सेवा उपलब्ध नसेल.

हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी दोन्ही दिशेकडील लोकल सेवा रविवारी सकाळी ११.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत रद्द करण्यात येईल. सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ दरम्यान सीएसएमटीहून बेलापूर/पनवेल दिशेकडे तसेच सकाळी ११.०६ ते दुपारी ४.०१ पर्यंत बेलापूर/पनवेलहून सीएसएमटी दिशेकडे एकही लोकल धावणार नाही. ब्लॉकदरम्यान पनवेल-अंधेरी लोकल सेवाही रद्द करण्यात येईल. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटीहून वाशीदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील.

ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे-पनवेल लोकल रद्द
ट्रान्स हार्बर मार्गावरील पनवेलहून ठाणे दिशेकडे सकाळी १०.१२ ते दुपारी ३.५३ पर्यंत एकही लोकल धावणार नाही. ठाण्याहून पनवेल दिशेकडे जाणाºया लोकलही सकाळी ११.१४ ते दुपारी ३.२० पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान लोकलसेवा उपलब्ध असेल.

पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन जम्बोब्लॉक

वसई रोड ते भार्इंदर स्थानकांदरम्यान शनिवारी-रविवारीच्या मध्यरात्री रात्रकालीन जम्बोब्लॉक घेण्यात येईल. शनिवारी रात्री १२.३० ते रविवारी पहाटे ४ वाजेपर्यंत साडेतीन तासांचा रात्रकालीन जम्बोब्लॉक असेल. यामुळे दोन्ही दिशेकडील काही लोकल रद्द करण्यात येतील. रविवारी मात्र पश्चिम रेल्वे मार्गावर कोणताही दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार नाही.

Web Title: Megablock on Sunday on the Central, Harbor Railway, giving relief to Western Railway passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.