लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देखभाल, दुरुस्तीच्या विविध कामांसाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी, २३ मे राेजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावर भायखळा-माटुंगा दाेन्ही मार्गांवर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४९ ते दुपारी ३.४८ पर्यंत धावणाऱ्या जलद मार्गावरील फेऱ्या भायखळा ते माटुंगादरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. त्या वेळापत्रकानुसार निर्धारित स्थानकांवर थांबतील. त्यानंतर माटुंगा येथे डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील.
कुर्ला येथून सकाळी ११.०६ ते दुपारी ३.५७ पर्यंत धावणाऱ्या जलद लाेकलच्या फेऱ्या माटुंगा ते भायखळादरम्यान अप धिम्या मार्गावर वळविल्या जातील व वेळापत्रकानुसार निर्धारित स्थानकांवर थांबून पुढे भायखळा येथे अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. या सर्व गाड्या नियाेजित वेळापत्रकापेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
हार्बर रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी / वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपाररी ४.४० वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी / वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / वडाळा रोड येथून डाऊन हार्बर मार्गावरील सकाळी ११.३४ ते सायंकाळी ४.४७ वाजेपर्यंत वाशी / बेलापूर / पनवेलकरिता सुटणाऱ्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी ९.५६ ते संध्याकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे / गोरेगावकरिता सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पनवेल / बेलापूर / वाशी येथून अप हार्बर मार्गावर सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या तसेच गोरेगाव / वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते संध्याकाळी ४.५८ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
....................................