Join us

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; प्रवाशांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 3:42 AM

हार्बरवर पनवेल ते कुर्ला विशेष लोकल; मध्य रेल्वे मार्गावर लोकल धावणार १५ ते २० मिनिटे उशिराने

मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि इतर पायाभूत कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल. पश्चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रुझ ते गोरेगाव धिम्या मार्गावर ब्लॉक असेल. त्यामुळे राम मंदिर स्थानकावर लोकलला थांबा नसेल. ब्लॉकमुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावतील. त्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची चिन्हे आहेत.मध्य रेर्ल्वेवर रविवारी सकाळी ११.२० ते दुपारी ३.५० वाजेपर्यंत कल्याण ते ठाणे - सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावर मेगाब्लॉक असेल. त्यामुळे कल्याण ते ठाणेदरम्यान जलद लोकल धिम्या मार्गावर धावतील. सकाळी १०.१६ ते दुपारी ३.२२ वाजेपर्यंत सीएसएमटीहून कल्याण दिशेकडे जाणाºया जलद लोकल संबंधित थांबा घेत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकांवर थांबा घेतील.हार्बर मार्गावरील सीएसएमटीहून चुनाभट्टी / वांद्रे दिशेकडे रविवारी सकाळी ११.४० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत तसेच चुनाभट्टी / वांद्रेहून सीएसएमटी दिशेकडे सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत एकही लोकल धावणार नाही. याचप्रमाणे सीएसएमटी / वडाळा रोडहून वाशी / बेलापूर / पनवेल दिशेकडे सकाळी ११.३४ ते दुपारी ४.२३ वाजेपर्यंत आणि पनवेल/ बेलापूर / वाशीहून सीएसएमटी दिशेकडे सकाळी ९.५३ ते दुपारी २.४४ वाजेपर्यंत एकही लोकल धावणार नाही. सीएसएमटीहून वांद्रे / गोरेगाव दिशेकडे जाणाºया लोकल सकाळी ९.५६ ते दुपारी ४.१६ वाजेपर्यंत तर, गोरेगाव / वांद्रेहून सीएसएमटी दिशेकडे जाणाºया लोकल सकाळी १०.४५ ते दुपारी ४.५८ वाजेपर्यंत रद्द केल्या जातील. ब्लॉककाळात पनवेल ते कुर्ला मार्गावर विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.पश्चिम रेल्वे मार्गावर पाच तासांचा जम्बोब्लॉकसांताक्रुझ ते गोरेगावदरम्यान दोन्ही दिशेकडील धिम्या मार्गावर रविवारी सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रुझ ते गोरेगावदरम्यान रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत पाच तासांचा जम्बोब्लॉक असेल. ब्लॉककाळात धिम्या मार्गावरील लोकल सांताक्रुझ ते गोरेगावदरम्यान जलद मार्गावर धावतील. विलेपार्ले स्थानकावरील फलाट क्रमांक ५ व ६ ची लांबी कमी असल्याने येथे लोकलला दोनदा थांबा दिला जाईल. तर, राम मंदिर स्थानकावर जलद मार्गावर फलाट नसल्याने या स्थानकावर लोकलला थांबा नसेल.

टॅग्स :पश्चिम रेल्वेमध्य रेल्वेहार्बर रेल्वे