Join us

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2021 4:10 AM

मुंबई : विविध देखभाल दुरुस्तींचे काम करण्यासाठी उद्या, रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

मुंबई : विविध देखभाल दुरुस्तींचे काम करण्यासाठी उद्या, रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.३७ ते दुपारी २.४८ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळविल्या जातील आणि ठाणे आणि कल्याण स्थानकांमधील सर्व स्थानकांवर थांबतील. या सेवा त्यांच्या गंतव्यस्थानावर वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील. कल्याण येथून सकाळी १०.२६ ते दुपारी ३.१९ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद/अर्ध जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि सर्व स्थानकांवर थांबतील. या सेवा मुलुंड येथून अप जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील. या सेवा त्यांच्या गंतव्यस्थानावर वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.

तर हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी / वांद्रे डाऊन मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी / वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ११.३४ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत वाशी /बेलापूर /पनवेलकरिता सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.५६ ते सायंकाळी ४.४३ या वेळेत वांद्रे/गोरेगाव करिता सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करिता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सकाळी १०.४५ ते सायंकाळी ४.५८ पर्यंत सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

पश्चिम रेल्वेचा प्रवाशांना दिलासा

विविध देखभाल दुरुस्ती काम करण्यासाठी रविवारी मध्यरात्री १२ ते पहाटे ४ या वेळच्या बोरिवली ते गोरेगाव स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात बोरिवली ते गोरेगाव स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर चालविल्या जाणार आहे, तर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात असल्याने दिवसकालीन मेगाब्लॉक घेतला जाणार नाही, त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.