Join us

मध्य, हार्बर रेल्वेमार्गावर उद्या मेगाब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देखभाल व दुरुस्तीचे कार्य करण्यासाठी मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर रविवार, १६ मे राेजी मेगाब्लॉक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देखभाल व दुरुस्तीचे कार्य करण्यासाठी मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर रविवार, १६ मे राेजी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

मध्य रेल्वेमार्गावर माटुंगा-मुलुंड अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३६ या दरम्यान सुटणाऱ्या डाउन धिम्या मार्गावरील सेवा माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविल्या जातील आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप स्थानकांवर थांबतील. पुढे मुलुंड स्थानकापासून धिम्या मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील.

ठाणे येथून सकाळी १०.२७ ते दुपारी ३.५५ पर्यंत अप धिम्या मार्गावरून सुटणाऱ्या उपनगरी गाड्या मुलुंड ते माटुंगादरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येणार असून भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. पुढे माटुंगा येथे अप धिम्या मार्गावर पुन्हा वळविण्यात येईल.

हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप व डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० दरम्यान मेगाब्लॉक असेल. सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणारी वाशी / बेलापूर / पनवेलकरिता डाऊन हार्बर मार्गावरील सेवा व पनवेल / बेलापूर / वाशी येथून सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकरिता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कुर्ला आणि पनवेल - वाशी विभागांदरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.

.............................