मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:06 AM2021-04-24T04:06:31+5:302021-04-24T04:06:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विविध देखभाल - दुरुस्ती कामांसाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवार, २५ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विविध देखभाल - दुरुस्ती कामांसाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवार, २५ एप्रिल राेजी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) व विद्याविहार दरम्यान रविवारी सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक असेल. सकाळी १०.४८ ते दुपारी ३.३६ पर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या धिम्या फेऱ्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील तसेच त्या मशीद बंदर, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करीरोड आणि विद्याविहार या स्थानकांवर थांबणार नाहीत. त्यानंतर नियोजित मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील.
घाटकोपर येथून सकाळी १०.४० ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार व सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. त्या विद्याविहार, करीरोड, चिंचपोकळी, सँडहर्स्ट रोड आणि मशीद बंदर या स्थानकांवर थांबणार नाहीत. या कालावधीत अप व डाऊन धिम्या मार्गावरील गाड्या मशीद बंंदर, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करीरोड आणि विद्याविहार या स्थानकांवर उपलब्ध होणार नाहीत.
हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला - वाशी अप व डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० दरम्यान मेगाब्लॉक असेल. सीएसएमटीहून रविवारी सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ पर्यंत वाशी, बेलापूर, पनवेलसाठी तसेच पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ या वेळेत सीएसएमटीसाठी एकही गाडी धावणार नाही. ब्लॉककाळात सीएसएमटी आणि कुर्लादरम्यान तसेच पनवेल आणि वाशीदरम्यान विशेष सेवा चालविण्यात येतील.
..............................