मध्य, हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:06 AM2021-03-20T04:06:20+5:302021-03-20T04:06:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अभियांत्रिकी व देखभालीच्या कामासाठी रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. छत्रपती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अभियांत्रिकी व देखभालीच्या कामासाठी रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्याविहार अप व डाऊन धिम्या मार्गावर रविवार, २१ मार्च सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक असेल. सकाळी १०.४८ ते दुपारी ३.३६ वाजेपर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील सेवा सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळविल्या जातील आणि त्यापुढे धिम्या मार्गावर वळविल्या जातील. सकाळी १०.४० ते दुपारी ३.५२ या वेळेत घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते सीएसएमटीदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. या काळात मस्जिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड आणि विद्याविहार येथे धिम्या मार्गावर लाेकल थांबणार नाही.
* पनवेल ते कुर्ला विशेष लाेकल
सीएसएमटी-चुनाभट्टी / वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी / वांद्रे - सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. सीएसएमटी / वडाळा रोड येथून सकाळी ११.३४ ते दुपारी ४.४७ पर्यंत तसेच सीएसएमटीहून वांद्रे / गोरेगावसाठी सकाळी ९.०२ ते सायंकाळी ४.४३ पर्यंत एकही लाेकल धावणार नाही. याचप्रमाणे पनवेल / बेलापूर / वाशी येथून सीएसएमटीसाठी सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत तसेच गोरेगाव / वांद्रे येथून सीएसएमटीसाठी सकाळी १०.१० ते सायंकाळी ४.५८ पर्यंत अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. या काळात पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष लाेकल धावतील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना त्याच तिकीट किंवा पासवर सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे.