Join us

मध्य, हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 4:08 AM

देखभाल-दुरुस्तीचे कामलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी रविवार, दि. ...

देखभाल-दुरुस्तीचे काम

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी रविवार, दि. १७ जानेवारी राेजी मेगाब्लॉक घेण्यात येईल.

मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा - मुलुंड अप व डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० पर्यंत मेगाब्लॉक असेल. सकाळी १०.२५ ते दुपारी ३.२१ या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुटणाऱ्या डाऊन जलद फेऱ्या माटुंगा येथे डाऊन धीम्या मार्गावर वळविल्या जातील आणि सायन व मुलुंड दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील. त्या नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा गंतव्यस्थानी पोहोचतील. ठाण्यापुढील जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलदमार्गावर पुन्हा वळविण्यात येतील.

सकाळी १०.४६ ते दुपारी ३.२६ या वेळेत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि मुलुंड ते दादर स्थानकांदरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा गंतव्यस्थानी पोहोचतील.

* हार्बर मार्गावर विशेष फेऱ्या

हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला - वाशी अप व डाऊन हार्बर मार्ग रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असेल. सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ या दरम्यान सीएसएमटीहून वाशी, बेलापूर, पनवेलसाठी तसेच पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ या दरम्यान सीएसएमटीसाठी एकही लाेकल धावणार नाही. ब्लॉककाळात सीएसएमटी - कुर्ला आणि वाशी-पनवेलदरम्यान विशेष फेऱ्या चालविल्या जातील.

.....................................