Mumbai Train Update: मध्य, हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 04:08 AM2019-11-30T04:08:15+5:302019-11-30T04:08:39+5:30
Mega Block (1 December 2019) Update: मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते ठाणे दरम्यान रविवारी ब्लॉक घेण्यात येईल. परिणामी, जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावर धावतील. हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात येतील, तर पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन ब्लॉक असल्याने दिवसकालीन ब्लॉक नसेल.
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते ठाणे दरम्यान रविवारी ब्लॉक घेण्यात येईल. परिणामी, जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावर धावतील. हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात येतील, तर पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन ब्लॉक असल्याने दिवसकालीन ब्लॉक नसेल.|
मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते ठाणे दरम्यान सीएसएमटी दिशेकडील जलद मार्गावर रविवार १ डिसेंबर रोजी सकाळी ११.२० ते दुपारी ३.५० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. परिणामी, कल्याण ते ठाणे दरम्यान सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या जलद लोकल धिम्या मार्गावर चालविण्यात येतील. ठाण्यानंतर या लोकल जलद मार्गावर चालविण्यात येतील.
हार्बर मार्गावरील वडाळा रोड ते वाशी दोन्ही दिशेकडे सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत एकही लोकल धावणार नाही. सकाळी १०.३४ ते दुपारी ३.१६ पर्यंत सीएसएमटीहून पनवेल/ बेलापूर/वाशी दिशेकडे जाणाºया तसेच सकाळी १०.१७ ते दुपारी ३ पर्यंत पनवेल/ बेलापूर/वाशीहून सीएसएमटी दिशेकडे जाणाºया लोकल फेºया रद्द करण्यात येतील. पनवेल ते वाशी दरम्यान विशेष लोकलसेवा चालविण्यात येईल.
३० नोव्हेंबरच्या रात्री पश्चिम रेल्वेवरील वसई रोड ते वैतरणा स्थानकादरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येईल. वसई रोड ते वैतरणा स्थानकादरम्यान चर्चगेट दिशेकडील जलद मार्गावर मध्यरात्री ११.५० ते रात्री २.५० पर्यंत तीन तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. मध्यरात्री १.३० ते पहाटे ४.३० पर्यंत तीन तासांचा विरार दिशेकडील जलद मार्गावर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येईल. पहाटे ४ वाजताची विरार-डहाणू मेमू ट्रेन ब्लॉकमुळे विरारहून पहाटे ४ वाजेऐवजी पहाटे ४.४० वाजता सुटेल. पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी दिवसकालीन ब्लॉक नसेल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
कुर्ला येथे आज रात्रकालीन ब्लॉक; मध्य, हार्बरच्या प्रवाशांना त्रास
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला स्थानकातील पादचारी पुलाच्या गर्डरचे पाडकाम ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबरच्या रात्री केले जाईल. या कामासाठी मध्य रेल्वेने विशेष ब्लॉक घेतला आहे. ३० नोव्हेंबरच्या रात्री ११.५० ते पहाटे ४.५० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. परिणामी, हार्बरवरील सीएसएमटी दिशेकडील लोकल सेवा रात्री ९.१६ पासून व वाशी, बेलापूर, पनवेलकडे जाणारी लोकल सेवा रात्री ११.१४ पासून पूर्णपणे बंद असेल. त्यामुळे प्रवाशांना त्रास होईल.
सीएसएमटीहून वाशी, बेलापूर, पनवेल दिशेकडे रात्री ९.१६ ते पहाटे ४.२५ वाजेपर्यंत व वाशी, बेलापूर, पनवेलहून सीएसएमटी दिशेकडे रात्री ११.१४ ते पहाटे ५.०६ पर्यंत पूर्णपणे बंद असेल. रात्री १०.१९ वाजताची पनवेल-सीएसएमटी लोकल कुर्ला येथून धावेल. रात्री ११.१३ वाजताची पनवेल-सीएसएमटी लोकल मानखुर्द स्थानकापर्यंत धावेल. मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी दिशेकडील जलद मार्गावरील रात्री ११.२० नंतरच्या लोकल मुलुंड ते माटुंगा दरम्यान धिम्या मार्गावरून धावतील.