मुंबई : मध्य, तसेच हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा ते मुलुंड दरम्यान सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावर ब्लॉक असेल. या दरम्यान सर्व लोकल धिम्या मार्गावर धावतील, तर हार्बर मार्गावरील काही लोकल रद्द करण्यात येतील. पश्चिम रेल्वे मार्गावर मात्र ब्लॉक घेण्यात येणार नाही.मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान सीएसएमटी दिशेकडे जाणाºया जलद मार्गावर रविवार, ५ जानेवारी रोजी सकाळी ११.३० ते दुपारी ४ पर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक काळात सीएसएमटी दिशेकडे जाणाºया सर्व लोकल दिवा ते परळ या दरम्यान धिम्या मार्गावर धावतील, तसेच या लोकल सर्व स्थानकांवर थांबतील.हार्बर मार्गावरील सीएसएमटीहून चुनाभट्टी/वांद्रे दिशेकडे जाणाºया लोकल सकाळी ११.४० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत रद्द करण्यात येतील. चुनाभट्टी/वांद्रेहून सीएसएमटी दिशेकडे सकाळी ११.१० ते दुपारी ३.४०पर्यंत, तसेच सकाळी ११.३४ ते दुपारी ४.२३ पर्यंत सीएसएमटी/वडाळा रोड येथून वाशी/बेलापूर/पनवेल दिशेकडे एकही लोकल धावणार नाही. सकाळी ९.५६ ते दुपारी ४.१६ पर्यंत सीएसएमटीहून वांद्रे/गोरेगावकडे, तसेच सकाळी ९.५३ ते दुपारी २.४४ पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीहून सीएसएमटीकडे जाणाºया सर्व लोकल रद्द करण्यात येतील. याचप्रमाणे, सकाळी १०.४५ ते दुपारी ४.५८ पर्यंत गोरेगाव/वांद्रेहून सीएसएमटीकडे एकही लोकल धावणार नाही. ब्लॉकदरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल धावतील.दादर-रत्नागिरी पॅसेंजर दिवा येथून सुटणाररत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडीची सेवा रविवारी दिवा स्थानकावर समाप्त करण्यात येईल, तर दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी दादरऐवजी दिवा स्थानकातून सुटेल. प्रवाशांच्या सोयीसाठी ती दादर स्थानकातून दुपारी ३.४० वाजता सुटेल. ही लोकल दिवा येथे दुपारी ४.१८ वाजता पोहोचेल.
Mumbai Train Update : मध्य, हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2020 4:27 AM