मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक; धिम्या लोकल जलद मार्गावरून धावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 01:18 AM2019-09-14T01:18:35+5:302019-09-14T01:18:51+5:30
ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा येथे लोकलला थांबा नाही
मुंबई : रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यानुसार मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते ठाणे यादरम्यान सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या धिम्या मार्गावर रविवारी सकाळी १०.४८ ते दुपारी ३.५१ मेगाब्लॉक घेण्यात येईल. यादरम्यान धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर चालविण्यात येतील. त्यामुळे ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा या स्थानकांवर लोकल थांबा घेणार नाही.
हार्बर मार्गावरील वाशी आणि पनवेल दोन्ही दिशेकडील लोकल सकाळी ११.३० ते दुपारी ४ पर्यंत रद्द केल्या जातील. माहिम-गोरेगाव दोन्ही दिशेकडे सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत एकही लोकल धावणार नाही. सीएसएमटीहून पनवेल / बेलापूर मार्गावरील लोकल सकाळी ११.०६ ते सायंकाळी ४.०१ वाजेपर्यंत रद्द केल्या जातील. बेलापूर / पनवेलहून सीएसएमटी दिशेकडे सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ वाजेपर्यंत एकही लोकल धावणार नाही.
ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सकाळी १०.१२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत ठाणे ते पनवेल / बेलापूर, व सकाळी ११.१४ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेलहून ठाणे दिशेकडे जाणाºया लोकल रद्द केल्या आहेत. रविवारी सकाळी ९.५६ ते दुपारी ३.४८ पर्यंत सीएसएमटी ते वांद्रे / गोरेगाव लोकल रद्द केल्या जातील. सकाळी १०.४५ ते दुपारी ४.०१ पर्यंत गोरेगाव / वांद्रे ते सीएसएमटी येथे एकही लोकल धावणार नाही. ब्लॉक काळात ठाणे ते वाशी / नेरूळ ट्रान्सहार्बर आणि सीएसएमटी ते वाशी मार्गावर विशेष लोकल सेवा चालविण्यात येतील.
माहिम ते गोरेगाव जम्बोब्लॉक
पश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे हार्बर मार्गावरील माहिम ते गोरेगाव या स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेकडील मार्गावर रविवारी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. या वेळी चर्चगेट ते गोरेगाव धिम्या मार्गावरील लोकल रद्द करण्यात येतील.