मुंबई : विविध कामे करण्यासाठी रविवार, दि. ३० जुलैला रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकमुळे अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्यांना लेटमार्क बसणार आहे.
मध्य रेल्वे
कुठे: ठाणे-कल्याण पाचवी-सहावी मार्गिकेवरकधी : सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंतपरिणाम : या ब्लॉकदरम्यान मुंबईकडे येणाऱ्या मेल / एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविल्या जातील, तर मुंबईतून जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. या दोन्ही दिशेच्या मेल-एक्स्प्रेस गाड्या १० ते १५ मिनिटांच्या विलंबाने गंतव्यस्थानी पोहोचतील.
हार्बर रेल्वे
कुठे : पनवेल-वाशी अप-डाऊन हार्बर मार्गावरकधी : सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत पनवेल / बेलापूर येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल / बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून ठाण्याकरिता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून ठाण्याकरिता सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा रद्द राहतील. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल.
पश्चिम रेल्वे
कुठे : मरिन लाइन्स ते माहीत अप-डाऊन धीम्या मार्गावर
कधी : सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ परिणाम : अप-डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा मरीन लाइन्स ते माहीम स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. लोअर परळ आणि माहीम जंक्शन येथे डाऊन दिशेच्या सर्व धीम्या सेवांना दुहेरी थांबा.
या गाड्यांना फटका
पुणे-सीएसएमटी सिंहगढ, नांदेड-सीएसएमटी राज्यराणी, पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन, मंगलुरू-सीएसएमटी, पटना-एलटीटी, काकीनाडा-एलटीटी, पुणे-सीएसएमटी प्रगती, चेन्नई-सीएसएमटी, बनारस-एलटीटी सुपरफास्ट, हावडा-सीएसएमटी मेल, हटिया-एलटीटी, सीएसएमटी-कोल्हापूर, एलटीटी-गोरखपूर, एलटीटी-जयनगर आणि एलटीटी-तिरुवनंतपूरम नेत्रावती या एक्स्प्रेसना १० ते १५ मिनिटे लेटमार्क.