मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक, गरज असेल तरच प्रवास करा..!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 09:48 AM2023-06-24T09:48:23+5:302023-06-24T09:48:53+5:30
पुढे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळविल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
मुंबई : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून रविवारी २५ जून रोजी माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.१८ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येतील आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. पुढे मुलुंड स्थानकावर धीम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
ठाणे येथून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.५९ यावेळेत अप धीम्या मार्गावरील लोकल मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकावर थांबतील. पुढे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळविल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत पनवेल / बेलापूर / वाशी कडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी / बेलापूर / पनवेल येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्ला आणि पनवेल-वाशी या भागांत विशेष लोकल चालविण्यात येतील.