Join us

मध्य, हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2019 5:05 AM

वडाळा रोड ते मानखुर्द लोकलसेवा रद्द : पनवेल, मानखुर्ददरम्यान विशेष सेवा

मुंबई : देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी मध्य, तसेच हार्बर रेल्वे मार्गावर रविवार, ५ मे रोजी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते ठाणे दरम्यान सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावर सकाळी १०.५४ ते दुपारी ३.५२ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. यावेळी सीएसएमटी दिशेकडे जाणाºया जलद मार्गावरील लोकल कल्याण ते ठाणे स्थानकादरम्यान धिम्या मार्गावरून धावतील.

रविवारी सकाळी १०.१६ ते दुपारी ३.२२ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून (सीएसएटी) कल्याण दिशेकडे जाणाºया लोकल नियोजित थांब्यांसह घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा या स्थानकावर थांबतील. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या मेल, एक्स्प्रेस २० ते ३० मिनिटे उशिराने पोहोचतील.

हार्बर मार्गावरील वडाळा रोड ते मानखुर्द दोन्ही मार्गांवर रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. यावेळी दोन्ही मार्गांवरून एकही लोकल धावणार नाही. सकाळी १०.३४ ते दुपारी ३.४४ वाजेपर्यंत मिनिटांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पनवेल, बेलापूर, वाशीसाठी सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत पनवेल, बेलापूर, वाशी ते सीएसएमटीसाठी सुटणाºया लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. लॉकदरम्यान पनवेल ते मानखुर्द विशेष लोकल सेवा चालविण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनकाडून जाहीर करण्यात आले आहे.

मध्य, हार्बर मार्गावरून प्रवास करण्याची सवलतमेगाब्लॉक लक्षात घेता, हार्बर मार्गावरील प्रवाशांना त्रास होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, या प्रवाशांना त्यांच्या त्याचा तिकीट किंवा पासवर रविवारी सकाळी १० ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.हार्बरच्या मार्गावर वांद्रे येथे आज रात्रकालीन विशेष मेगाब्लॉकपश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे वांद्रे स्थानकावर गर्डर हटविण्यचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील दोन्ही दिशेकडील मार्गावर सहा तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. ४ मे रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते ५ मे रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ४ मे रोजी हार्बर मार्गावरील सीएसएमटीहून अंधेरीकडे रात्री १० वाजून १२ मिनिटांपासून, तसेच ४ मे रोजी वांद्रे, अंधेरी, गोरेगावहून सीएसएमटी दिशेकडे रात्री १० वाजून ३८ मिनिटांपासून सकाळी ५ वाजेपर्यंत एकही लोकल धावणार नाही.पश्चिम मार्गावर दिवसकालीन ब्लॉक रद्दपश्चिम रेल्वे मार्गावर रविवार, ५ मे रात्री वसई रोड आणि भाईंदर स्थानकादरम्यान ब्लॉक असेल. ५ मे रोजी मध्यरात्री १२३० ते पहाटे ४ वाजेपर्यंत वसई रोड आणि भाईंदर स्थानकादरम्यान दोन्ही दिशेकडील जलद मार्गावर साडेतीन तासांचा जम्बो ब्लॉक असेल. त्यामुळे या मार्गावर ५ मे रोजी दिवसकालीन ब्लॉक नसेल. यासह वांद्रे स्थानकावर गर्डर हटविण्याचे काम करण्यात येईल. त्यामुळे ४ मे रोजी मध्यरात्री ११ ते ५ मे रोजी पहाटे ५पर्यंत हार्बरच्या दोन्ही मार्गांवर ब्लॉक असेल. जलद मार्गावरील लोकल सांताक्रुझ आणि माहिम स्थानकादरम्यान धिम्या मार्गावर चालविण्यात येतील.

टॅग्स :रेल्वे