Join us

मेगाब्लॉक, त्यात सिग्नल यंत्रणेत बिघाड

By admin | Published: May 01, 2017 4:43 AM

कल्याण- ठाणेदरम्यान धीम्या मार्गावर रविवारी मेगाब्लॉक असतानाच, ऐन दुपारी जलदगती मार्गावर दिवा आणि पारसिक

ठाणे : कल्याण- ठाणेदरम्यान धीम्या मार्गावर रविवारी मेगाब्लॉक असतानाच, ऐन दुपारी जलदगती मार्गावर दिवा आणि पारसिक बोगद्यादरम्यान सिग्रल यंत्रणेत बिघाड झाल्याने वाहतूक ठप्प झाली आणि प्रवाशांचे अतोनात हाल झाले. दुपारी एकच्या दरम्यान सिग्नल यंत्रणेतील बिघाडाने अनेक लोकल जागेवरच उभ्या राहिल्याने कल्याण, डोंबिवली, दिवा स्थानकात गर्दी झाली होती. वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद राहील, अशा घोषणा सुरू झाल्या. मात्र अर्ध्या तासात वाहतूक सुरू झाली.मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर कल्याण ते ठाणेदरम्यान अप स्लो मार्गावर - मुंबईकडे येणाऱ्या धीम्या मार्गावर- सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ पर्यंत दुरु स्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मेगाब्लॉकमुळे ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा स्थानकात लोकल थांबत नव्हत्या. त्यातच सिग्नल यंत्रणेमुळे गाड्यांच्या रांगा लागल्या. लोकल आणि मेल-एक्स्प्रेसमधील प्रवाशांच्या त्रासात भर पडत गेली. कल्याणातून दुपारी १२.२५ ला सुटणारी लोकल २० ते २५ मिनिटे उशिरा आल्यानंतर ती जवळपास १५ ते २० मिनिटे कल्याण स्थानकातच थांबून होती. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. (प्रतिनिधी)