मुंबई : मध्य व हार्बर मार्गावर देखभाल दुरुस्तीच्या कारणात्सव रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे-कल्याण डाउन जलद मार्गावर सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत रेल्वे प्रशासनाने ब्लॉक घोषित केला आहे. हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० ब्लॉक घेण्यात येईल.ठाणे-कल्याण डाउन जलद मार्गावर सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. सकाळी ९.२५ ते दुपारी २.५४ वाजेपर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाउन जलद, सेमी जलद मार्गावरील गाड्या निर्धारित थांब्याशिवाय घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड येथे थांबतील. ठाणे, कल्याण स्थानकादरम्यान डाउन धिम्या मार्गावरील गाड्या सर्व स्थानकावर थांबतील.हार्बर मार्गावरील सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत ब्लॉक असेल. सकाळी ११.३४ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोडपासून वाशी/बेलापूर/पनवेल मार्गावरून सुटणाºया सर्व गाड्या, तसेच सकाळी ९.५६ ते सायंकाळी ४.४३पर्यंत सीएसएमटीपासून वांद्रे/अंधेरी/गोरेगाव मार्गावरून सुटणाºया गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२०पर्यंत पनवेल/बेलापूर/ वाशीपासून सीएसएमटीला सुटणाºया अप हार्बर मार्गावरील सर्व लोकल रद्द केल्या आहेत. सकाळी १०.४५ ते सायंकाळी ४.५८ वाजेपर्यंत अंधेरी/ वांद्रे/गोरेगावपासून सीएसएमटीकडे अप हार्बर मार्गावरून एकही लोकल धावणार नाही.विशेष लोकलब्लॉकदरम्यान पनवेल-कुर्ला मार्गावरून विशेष गाड्या चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील सर्व प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करता येईल.पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासाबोरीवली आणि भार्इंदर स्थानकांदरम्यान शनिवार मध्यरात्री १२ वाजून ५० मिनिटे ते रविवार पहाटे ४ वाजून ५० मिनिटांपर्यंत रात्रकालीन जम्बोब्लॉक घेण्यात आल्याने पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारचा दिवसकालीन ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
आज मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 2:09 AM