मध्य, हार्बरवर उद्या मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 05:40 AM2019-03-30T05:40:05+5:302019-03-30T05:45:01+5:30

मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते कल्याण तसेच हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी, गोरेगाव असा मेगाब्लॉक रविवारी घेण्यात आला आहे.

Megablocks on Harbour tomorrow; Night block at Western Railway | मध्य, हार्बरवर उद्या मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

मध्य, हार्बरवर उद्या मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

Next

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते कल्याण तसेच हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी, गोरेगाव असा मेगाब्लॉक रविवारी घेण्यात आला आहे. तर, पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी आणि रविवारी रात्री ११ वाजल्यापासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत माहिम ते वांद्रे दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या धिम्या मार्गावर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान कल्याण दिशेकडील धिम्या मार्गावर रविवारी सकाळी १०.४७ वाजल्यापासून ते दुपारी ३.५० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे ब्लॉक काळात मुलुंड ते कल्याण लोकल जलद मार्गावर चालविण्यात येतील. तसेच या लोकलला ठाणे, दिवा आणि डोंबिवली स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या कालावधीत कल्याण स्थानकावरील कसारा दिशेकडील पादचारी पूल पाडण्याचे काम करण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
मेगाब्लॉकमुळे रविवारी सकाळी १०.३७ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ६ मिनिटांपर्यंत कल्याणहून सीएसएमटी दिशेकडे जाणारी जलद लोकल सेवा निर्धारित थांब्यांसह दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांवरही थांबविण्यात येईल.
तर, सकाळी ९ वाजून १८ मिनिटांपासून ते दुपारी २ वाजून ५४ मिनिटांपर्यंत सीएसएमटीहून कल्याण दिशेकडे जाणाऱ्या लोकल निर्धारित थांब्यांसह घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा या स्थानकांवरही थांबविण्यात येतील.

पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवार, रविवारी रात्री होणार काम
पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी आणि रविवारी रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत माहिम ते वांद्रे स्थानकादरम्यान दोन्ही दिशेकडील धिम्या मार्गावर ७ तासांचा रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला आहे. या रात्रकालीन ब्लॉकमध्ये पश्चिम रेल्वे मार्गावरील स्थानकावरील पायाभूत कामे केली जातील. ब्लॉकदरम्यान सांताक्रुझ ते मुंबई सेंट्रल मार्गादरम्यान जलद मार्गावरून लोकल चालविण्यात येतील. त्यामुळे माहिम, माटुंगा रोड, प्रभादेवी, लोअर परळ, महालक्ष्मी या स्थानकांवर लोकलला थांबा दिला जाणार नाही.
तर, मुंबई सेंट्रल ते सांताक्रुझ मार्गावर विरार दिशेकडे जाणाºया लोकलला महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकावर थांबा नसेल. लोअर परळ, माहिम, खार रोड स्थानकांवर लोकलला दोनदा थांबा दिला जाईल.

सीएसएमटी तसेच वडाळाहून वाशी, बेलापूर, पनवेल लोकल सेवा बंद
हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकादरम्यान दोन्ही दिशेकडील मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. चुनाभट्टी आणि वांद्रे ते सीएसएमटी स्थानकादरम्यान दोन्ही दिशेकडील मार्गावर सकाळी ११.१० वाजल्यापासून ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत लोकल सेवा बंद असेल. सीएसएमटीहून वांद्रे, अंधेरी, गोरेगावसाठी चालविण्यात येणारी लोकल सेवा सकाळी ९.५६ पासून ते दुपारी ४.१६ वाजेपर्यंत बंद असेल. याचप्रमाणे सकाळी ११.३४ वाजल्यापासून ते संध्याकाळी ४.२३ वाजेपर्यंत सीएसएमटी आणि वडाळाहून वाशी, बेलापूर, पनवेल लोकल सेवा बंद असेल. सकाळी ९.५३ वाजल्यापासून ते दुपारी २.४४ वाजेपर्यंत पनवेल, बेलापूर, वाशीहून सीएसएमटी तसेच सकाळी १०.४५ ते दुपारी ४.५८पर्यंत गोरेगाव, वांद्रेहून सीएसएमटी लोकल सेवा बंद असेल.

Web Title: Megablocks on Harbour tomorrow; Night block at Western Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.