मेगाब्लॉकने हार्बरवासीयांचे वाजवले ‘तीन’तेरा
By admin | Published: June 16, 2014 03:08 AM2014-06-16T03:08:58+5:302014-06-16T03:08:58+5:30
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गाबरोबरच हार्बरच्या तीन ठिकाणी रविवारी घेतलेल्या ब्लॉकमुळे हार्बरवासीयांना फटका बसला.
मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गाबरोबरच हार्बरच्या तीन ठिकाणी रविवारी घेतलेल्या ब्लॉकमुळे हार्बरवासीयांना फटका बसला. या तीनपैकी एक ब्लॉक पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गावर घेतला होता. तर पश्चिम रेल्वेवर मात्र ब्लॉक न घेतल्याने या मार्गावरील प्रवाशांची सुटका झाली.
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर चुनाभट्टी ते मस्जीद अप, वडाळा रोड ते माहीम अप आणि डाऊन आणि पश्चिम रेल्वेच्या हार्बरवर माहीम जंक्शन ते अंधेरी असा मेगा आणि जम्बोब्लॉक घेतला होता. या तिन्ही मार्गांवर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ब्लॉक घेतला होता. सीएसटी ते वांद्रे, अंधेरीपर्यंतची लोकल सेवा रद्द करण्यात आली होती. अप हार्बर मार्गावरून कुर्ला स्थानकातून सकाळी ११.0८ ते दुपारी ३.२0पर्यंत सुटणाऱ्या लोकल मुख्य मार्गाच्या जलद मार्गावरून भायखळापर्यंत धावत होत्या. या लोकल ट्रेनला सायन, माटुंगा, दादर, परेल या स्थानकांतही थांबा देण्यात येत होता. त्यानंतर अप धीम्या मार्गावर आल्यानंतर भायखळा ते सीएसटीदरम्यान सगळ्या स्थानकांवर थांबा दिला जाता होता. त्यामुळे हार्बरवासीयांना मोठा फटका बसत होता. (प्रतिनिधी)