मुंबई : मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेमार्गावर दिवा ते कल्याण डाउन जलद मार्गादरम्यान मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाउन मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेमार्गावर मात्र मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही, त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.मध्य मार्गावर दिवा ते कल्याणदरम्यान सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार असून, सकाळी ९.२५ ते दुपारी २.५४ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणाºया डाउन जलद आणि अर्ध जलद मार्गावरील लोकल नेहमीच्या स्थानकांशिवाय घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबतील. डाउन जलद लोकल ठाणे स्थानकाच्या पुढे ते कल्याण स्थानकापर्यंत डाऊन धिम्या मार्गावरून धावतील. या लोकल अंतिम स्थानकावर २० मिनिटे उशिरा पोहोचतील, तसेच सकाळी १०.३७ ते दुपारी ०३.०६च्या दरम्यान कल्याणवरून सुटणा-या अप जलद लोकल आणि अर्ध जलद लोकल निर्धारित स्थानकांशिवाय दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. त्यामुळे अंतिम स्थानकावर १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. सकाळी ११ ते सायंकाळी ५च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाºया सर्व लोकल अंतिम स्टेशनवर १० मिनिटे उशिरा पोहोचतील.हार्बर मार्गावर विशेष लोकलछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४०पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असेल. या काळात पनवेल ते कुर्लादरम्यान फलाट क्रमांक ८ वरून विशेष लोकल चालविण्यात येतील.
मध्य, हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 7:25 AM