मध्य, हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 06:42 AM2018-12-29T06:42:35+5:302018-12-29T06:42:49+5:30

मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा या स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर रविवारी सकाळी ११ वाजून १० मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल.

 Megablocks tomorrow on the Harbor, Harbor line, tonight block on Western Railway | मध्य, हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक

मध्य, हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक

Next

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा या स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर रविवारी सकाळी ११ वाजून १० मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. तर पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी कोणताही ब्लॉक नसून शनिवारी मध्यरात्री १२. ३० ते पहाटे ४ वाजेपर्यंत वसई रोड आणि भार्इंदर स्थानकात ब्लॉक असणार आहे.
रविवारी सकाळी १० वाजून ३७ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ३१ मिनिटांपर्यंत ठाणे स्थानकावरून अप धिम्या मार्गावरील सर्व लोकल वाहतूक मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येईल. त्या लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन या स्थानकांवर थांबविण्यात येणार असून माटुंगा येथून अप धिम्या मार्गावर धावतील. तर, सकाळी ११ वाजून ४ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ६ मिनिटांपर्यंत कल्याण स्थानकावरून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल संबंधित स्थानक थांब्यासह दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. यादरम्यान लोकल स्थानकावर पोहोचण्यास १५ मिनिटांचा विलंब लागेल. सकाळी १० वाजून १६ मिनिटांपासून ते दुपारी २ वाजून ५४ मिनिटांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून सुटणाºया डाऊन जलद मार्गावरील लोकल संबंधित थांब्यासह घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकावर थांबतील. यादरम्यान लोकल स्थानकावर पोहोचण्यास २० मिनिटांचा विलंब होईल.
हार्बर रेल्वेच्या कुर्ला ते वाशी या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर रविवारी सकाळी ११ वाजून १० मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक असेल. सकाळी १० वाजून ३४ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ८ मिनिटांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून पनवेल, बेलापूर आणि वाशी या स्थानकांसाठी एकही लोकल धावणार नाही. तसेच सकाळी १० वाजून २१ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत पनवेल, बेलापूर आणि वाशीवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सुटणाºया अप मार्गावरील लोकल सेवा बंद असेल. ब्लॉककाळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि वाशी-पनवेल स्थानकांदरम्यान विशेष सेवा पुरविण्यात येतील.

साडेतीन तासांचा जम्बोब्लॉक

रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार नाही. मात्र शनिवारी मध्यरात्री १२.३० ते पहाटे ४ वाजेपर्यंत वसई रोड आणि भार्इंदर या स्थानकांवरील अप आणि डाऊन जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात आला आहे. यादरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. सिग्नलिंग, रेल्वे रूळ दुरुस्ती, ओव्हरहेड वायर दुरुस्ती यासाठी हा साडेतीन तासांचा जम्बोब्लॉक घेण्यात येईल.

Web Title:  Megablocks tomorrow on the Harbor, Harbor line, tonight block on Western Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.