मुंबई : उपनगरी रेल्वेमार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी २६ मार्चला रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेकुठे : ठाणे-कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर, कधी : सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंतपरिणाम : या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान दरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या त्यांच्या शेड्यूल थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान थांबतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील. कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या त्यांच्या वेळापत्रकाच्या थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान थांबतील.
पश्चिम रेल्वेकुठे : जोगेश्वरी ते बोरीवली पाचव्या मार्गिकांवर, कधी : सकाळी १०. ५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंतपरिणाम : काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील. यासंदर्भात सविस्तर माहिती संबंधित स्टेशन मास्टरांकडे उपलब्ध आहे. या ब्लॉकमुळे २५ मार्चला अहमदाबादहून सुटणारी अहमदाबाद-बोरीवली एक्स्प्रेस सेवा विरार येथे समाप्त होईल.
हार्बर रेल्वेकुठे : कुर्ला-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर कधी : सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंतपरिणाम : सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूर आणि वाशीकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. वाशी, बेलापूर पनवेल येथून सीएसएमटी करीता सुटणाऱ्या अप हार्बरवरील सेवा रद्द राहतील. या कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेलदरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाइन सेवा उपलब्ध असेल.