Join us

डीम कन्व्हेअन्ससाठी गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांनी पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 4:06 AM

डीम कन्व्हेअन्ससाठी गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांनी पुढाकार घ्यावाम्हाडा सभापती डॉ. विनोद घोसाळकर यांचे आवाहनलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ...

डीम कन्व्हेअन्ससाठी गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांनी पुढाकार घ्यावा

म्हाडा सभापती डॉ. विनोद घोसाळकर यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्य शासनाने जारी केलेल्या डीम्ड कन्व्हेअन्ससाठी गृहनिर्माण संस्थांनी, सदस्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती डॉ. विनोद घोसाळकर यांनी केले.

अंधेरी येथे श्री समर्पण सोशल वेल्फेअर चॅरिटेबल ट्रस्ट व महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशनमार्फत ‘डीम्ड कन्व्हेअन्स विशेष मोहीम’ या विषयावर संवादात्मक कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी घोसाळकर यांनी डीम्ड कन्व्हेअन्ससाठी बिल्डर कधीच पुढाकार घेणार नाही, असे सांगत गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तसेच या कायद्याबाबत नागरिकांमध्ये आजही अनेक गैरसमज असल्याने त्याबाबत जनजागृती करणे गरजेचे असल्याने हा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

तर पुनर्विकासासाठी आरबीआयने घातलेली बंधने लवकरच दूर होतील. तसेच आज नोटबंदी, जीएसटीनंतर अनेक गृहनिर्माण प्रकल्प रखडले असून त्याला चालना देण्यासाठी तसेच गृहनिर्माण संस्थेतील सदस्यांचा फायदा होण्यासाठी स्वयंपुनर्विकास गरजेचे असल्याचे मत मुंबई बँकेचे संचालक अभिषेक घोसाळकर यांनी व्यक्त केले.

राज्य सरकारने लागू केलेल्या डीम्ड कन्व्हेअन्स कायद्यामुळे गृहनिर्माण संस्थांना होणाऱ्या फायद्याबाबत महासेवाचे अध्यक्ष रमेश प्रभू यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी ९० गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधीं सहभागी झाले होते.