पुरुष रुग्णांमध्ये मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक, वेळेवर निदान झाल्यास उपचार शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 02:33 AM2018-03-19T02:33:40+5:302018-03-19T02:33:40+5:30

जे. जे. रुग्णालयात मागच्या आठवड्यात सुरू झालेल्या कर्करोग बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या एकूण रुग्णांपैकी, पुरुष रुग्णांमध्ये मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे.

In men patients, oral cancer can be treated more frequently, if diagnosed properly | पुरुष रुग्णांमध्ये मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक, वेळेवर निदान झाल्यास उपचार शक्य

पुरुष रुग्णांमध्ये मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक, वेळेवर निदान झाल्यास उपचार शक्य

Next

मुंबई : जे. जे. रुग्णालयात मागच्या आठवड्यात सुरू झालेल्या कर्करोग बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या एकूण रुग्णांपैकी, पुरुष रुग्णांमध्ये मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे. रुग्णालयातील चार बाह्यरुग्ण विभागात साधारणत: दरदिवशी १५ रुग्ण तपासणीसाठी येत असल्याची माहिती वरिष्ठ डॉक्टरांनी दिली. त्याचप्रमाणे, येथे येणाºया रुग्णांमध्ये रक्ताच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे.
तसेच, रुग्णालयात येणाºया महिला रुग्णांमध्येही स्तनाचा आणि गर्भाशयाचा कर्करोग आढळून आला आहे. काही पुरुष रुग्णांमध्ये मेंदू आणि पोटाचा कर्करोगही दिसून आला आहे. राज्यभरातून या बाह्यरुग्ण विभागात येणाºया रुग्णांची संख्या अधिक असल्याचे निरीक्षण, रुग्णालयाचे सहायक प्राध्यापक आणि रेडिओथेरपी, अ‍ॅन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. दिलीप निकम यांनी दिली. या रुग्णांच्या उपचार प्रक्रियेविषयी रुग्णालयाने सर्व शाखेतील तज्ज्ञांचा बोर्ड स्थापन करण्यात आला आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार रुग्णांच्या उपचारांची दिशा ठरविण्यात येते. रेडिएशन, शस्त्रक्रिया यांविषयीचे निर्णय या बोर्डद्वारे घेण्यात येतात, अशी माहिती डॉ. निकम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
कर्करोगाचे निदान लवकर व्हावे, यासाठी जे. जे. रुग्णालयात हा विभाग सुरू करण्यात आला आहे. या बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची कर्करोग चाचणी करण्यात येते. याशिवाय कर्क रोगाचे निदान झाल्यानंतर, रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय खचून जातात. त्यासाठी उपचारासाठी काय करावे, कुठे जावे, याबाबत रुग्णांना आणि कुटुंबीयांना मार्गदर्शनही केले जाते. दर मंगळवार आणि बुधवार या दिवशी येथे तपासणी केली जाते. वेळेवर निदान झाल्याने रुग्ण बरा होऊ शकतो, याकरिता जे. जे. रुग्णालयात हा विभाग सुरू करण्यात आला आहे.

Web Title: In men patients, oral cancer can be treated more frequently, if diagnosed properly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.