Join us

मानसिक त्रास, आर्थिक पिळवणूक सुरूच, मुंबई विद्यापीठाच्या निकालाला दिरंगाईचे परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 4:54 AM

मुंबई विद्यापीठाने सर्व ४७७ निकाल १९ सप्टेंबर रोजी जाहीर केले. पण, ख-या अर्थाने सर्व निकाल जाहीर झाले नसल्याचे त्यानंतर उघड झाले. कारण, १९ सप्टेंबरनंतरही हजारो विद्यार्थी हे निकालापासून वंचित होते.

मुंबई : मुंबई विद्यापीठाने सर्व ४७७ निकाल १९ सप्टेंबर रोजी जाहीर केले. पण, ख-या अर्थाने सर्व निकाल जाहीर झाले नसल्याचे त्यानंतर उघड झाले. कारण, १९ सप्टेंबरनंतरही हजारो विद्यार्थी हे निकालापासून वंचित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यातच भर म्हणून आता विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूकदेखील झाल्याचे उघड झाले आहे.पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या पण निकाल न लागल्यामुळे प्रवेश गमावलेल्या विद्यार्थ्यांनाशुल्क परत देण्यास महाविद्यालये तयार नाहीत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे विद्यार्थी संघटनेने समोर आणले आहे.आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीत आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे निकालाला लेटमार्क लागला. निकाल जाहीर झाल्यावरही विद्यार्थ्यांना हातात गुणपत्रिका मिळण्यासाठीही उशीर झाला. तर, काही विद्यार्थ्यांचे निकाल चुकीचे लागले. पुनर्मूल्यांकनाच्या निकालातही विद्यापीठाकडून गोंधळ झाला. परिणामी, अनेक विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश आणि काही जणांना नोकºया गमवाव्या लागल्या. अनेक विद्यार्थ्यांना आॅक्टोबर महिन्यात विद्यापीठात खेपा मारल्यानंतर निकाल हातात मिळाले. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले आहे.विद्यापीठाचा निकालाचा गोंधळ सुरू असताना विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ देणार नाही, असे आश्वासन विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमांना तात्पुरते प्रवेश घ्या, असे सांगण्यात आले होते. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका न मिळाल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश घेता आला नाही. आता विद्यार्थी महाविद्यालयांकडे शुल्क परत मागत आहेत. पण, महाविद्यालये शुल्क देण्यास नकार देत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या मुंबई जिल्ह्याचेअध्यक्ष अ‍ॅड. अमोल मातेले यांनी सांगितले.>रक्कम न देणा-या महाविद्यालयावर कारवाई कराविद्यापीठाने पुनर्मूल्यांकनासाठी आधी शुल्क वाढवले होते. यंदा विद्यार्थ्यांना मोठा भुर्दंड पडला आहे. पुनर्मूल्यांकन, छायांकित प्रत आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश असे पैसे विद्यार्थ्यांकडून विद्यापीठाने घेतले आहेत. आता महाविद्यालयेही शुल्काचे पैसे परत करत नाहीत. अशा महाविद्यालयांवर विद्यापीठाने कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी, अशी मागणी मातेले यांनीकेली आहे.

टॅग्स :विद्यापीठमुंबई