राखी सावंतकडून मानसिक त्रास; तनुश्री दत्ताची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 10:14 AM2023-10-15T10:14:03+5:302023-10-15T10:14:20+5:30
२०१८ साली ‘मी टू’ या चळवळीदरम्यान राखी सावंतने आपल्याला मानसिक त्रास दिल्याचा आरोप करत तनुश्रीने ही तक्रार दाखल केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने आता ड्रामा क्वीन राखी सावंतविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल
केली आहे.
२०१८ साली ‘मी टू’ या चळवळीदरम्यान राखी सावंतने आपल्याला मानसिक त्रास दिल्याचा आरोप करत तनुश्रीने ही तक्रार दाखल केली आहे. त्यावेळी राखीने विविध सोशल मीडियावरून व्हिडीओ पोस्ट करून आपली बदनामी केली होती. त्यामुळे आपल्याला मानसिक त्रास झाला होता. त्यामुळेच मी यावेळी कायदेशीर मार्गाने जाण्याचा निर्णय घेतल्याचे तनुश्री म्हणाली. राखीने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
‘या’ कारणाने झालेले भांडण
राखी सावंतबद्दल बोलताना तनुश्री म्हणाली, एका गाण्यातून निर्मात्यांनी राखी सावंतला काढले होते आणि मला विचारणा केली होती. या एका कारणाने राखीने माझ्याशी भांडायला सुरुवात केली. त्यामुळे निर्मात्यांनी पुन्हा त्या प्रोजेक्टमधून मला काढलं आणि राखीला घेतले. अखेर आजपर्यंत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलेला नाही.