मेडिकल कॉलेजमध्ये आता मेंटल हेल्थ लॅब, ९ कोटी ६ लाखांच्या खर्चास शासनाची परवानगी

By संतोष आंधळे | Published: November 6, 2023 09:01 PM2023-11-06T21:01:47+5:302023-11-06T21:02:34+5:30

गेल्या काही वर्षात मानसिक आजारावरील उपचारात मोठे बदल झाले आहेत.

Mental health lab in medical college, government permission to spend 9 crore 6 lakhs | मेडिकल कॉलेजमध्ये आता मेंटल हेल्थ लॅब, ९ कोटी ६ लाखांच्या खर्चास शासनाची परवानगी

मेडिकल कॉलेजमध्ये आता मेंटल हेल्थ लॅब, ९ कोटी ६ लाखांच्या खर्चास शासनाची परवानगी

मुंबई: वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अख्त्यारीत येणाऱ्या २१ मेडिकल कॉलेजमध्ये राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या मानांकनानुसार मानसोपचार अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणारी मेंटल हेल्थ लॅब सुरू करण्यात येणार आहे. ही लॅब सुरू करण्यासाठी ज्या यंत्रसामग्रीची आवश्यकता असते त्यासाठी प्रत्येक कॉलेजच्या लॅबकरिता ४ कोटी ७१ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे या लॅब सुरू करण्याकरिता ९९ कोटी ६ लाखाच्या खर्चास शासनाने परवानगी दिली आहे.

गेल्या काही वर्षात मानसिक आजारावरील उपचारात मोठे बदल झाले आहेत. या आजाराच्या निदान आणि उपचारकरिता मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्रीची आवश्यकता भासत असते. त्या यंत्रसामग्री एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी त्यासाठी लॅब तयार करण्यात येते. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या मानांकनानुसार अशा पद्धतीची लॅब प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये ज्या ठिकणी पदव्युत्तर मानसोपचार शास्त्र हा विषय शिकविला जातो, त्या ठिकाणी अशी लॅब असणे गरजेचे आहे. त्यामुळे ही लॅब सुरू करण्यात येणार आहे. या लॅबमध्ये अद्यावत मशीनरी असणार असून त्याचा रुग्णांच्या निदानासाठी आणि उपचारासाठी फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Mental health lab in medical college, government permission to spend 9 crore 6 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.