मेन्यूकार्डवर कॅलरी काउंटचा उल्लेख हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 01:27 AM2018-05-21T01:27:37+5:302018-05-21T01:27:37+5:30
वेगाने बदलत जाणारी जीवनशैली, जंक फूड संस्कृतीचा वाढता प्रभाव आणि जागरूकतेचा अभाव हे घटक देशाला एका दुर्लक्षित, फारसा विचार न केल्या जाणाºया रोगाच्या साथीकडे घेऊन जात आहेत.
मुंबई : स्थूलत्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जेटी फाउंडेशन आणि डॉ. एल.एच. हिरानंदानी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इव्हॉल्व्ह २०१८- सेलीब्रेशन आॅफ हेल्थ’ हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी आशियातील पहिल्या महिला बेरिअॅट्रिक सर्जन डॉ. जयश्री तोडकर यांनी बालपणातील स्थूलत्वाविषयी काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. तसेच शाळेतील कॅन्टीनमध्ये, जंक फूडची विक्री करणाऱ्या उपाहारगृहांमधील मेन्यूकार्डवर कॅलरी काउंटचा उल्लेख केला जावा, अशी मागणी अन्न व औषध प्रशासनाकडे केली आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अर्थात एमयूएचएसचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसकर या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. तसेच त्रिपुराचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील, एफडीए आयुक्त डॉ. पल्लवी दराडे आणि जीवनशैलीतज्ज्ञ डॉ. मिकी मेहता आदी उपस्थित होते.
शाळेतील मुलांना चांगल्या दर्जाचे अन्न मिळावे यादृष्टीने २०१७ मध्ये केंद्र सरकारने एका कृतीदलाची स्थापना केली होती आणि शाळेच्या कँटीन्समध्ये जंक फूड ठेवण्यावर बंदी आणली होती. मेद, मीठ आणि साखरेचे प्रमाण अधिक असलेल्या जंक फूडमध्ये पोषकतत्त्वे खूपच कमी असतात.
पाठ्यपुस्तकातून जागृती व्हावी
वेगाने बदलत जाणारी जीवनशैली, जंक फूड संस्कृतीचा वाढता प्रभाव आणि जागरूकतेचा अभाव हे घटक देशाला एका दुर्लक्षित, फारसा विचार न केल्या जाणाºया रोगाच्या साथीकडे घेऊन जात आहेत. बालपणीच येणाºया स्थूलत्वामागील मुख्य कारण आहे जंक आणि पॅकेज्ड अन्नपदार्थ. शाळेतील कँटिन्ससाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्याची मागणी करणे गरजेचे आहे.