पारा चाळीशी, चक्रीवादळ आणि अवकाळी पावसाचा तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 07:21 PM2020-04-26T19:21:34+5:302020-04-26T19:22:10+5:30

विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात पाऊस पडेल

Mercury forty, hurricane and unseasonal rain hit | पारा चाळीशी, चक्रीवादळ आणि अवकाळी पावसाचा तडाखा

पारा चाळीशी, चक्रीवादळ आणि अवकाळी पावसाचा तडाखा

googlenewsNext

 


मुंबई : उत्तर आणि दक्षिण भारतात कमाल तापमान वाढीच्या वेगाचा आलेख उंचावत असतानाच आता २०२० या वर्षातील पहिले चक्रीवादळ १ मे रोजी उठण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बंगालची खाडी, अंदमानचा समुद्र येथे या चक्रीवादळाच्या निर्मितीचे संकेत मिळाले असून, या संकेतानुसार चक्रीवादळाचा पुढील प्रवास म्यानमार आणि बांग्लादेशाच्या दिशेने होईल, अशी माहिती स्कायमेटने दिली. तर दुसरीकडे महाराष्ट्रात २७ आणि २८ एप्रिल रोजी ठिकठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंशावर राहील; आणि महत्त्वाचे म्हणजे पारा वाढत असतानाच विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातपाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

सोमवारपासून रविवारपर्यंत महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरुपात पाऊस कोसळायला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान अभ्यासक किरणकुमार जोहरे यांनी व्यक्त केला आहे. विखुरलेल्या स्वरुपात तुरळक ते मध्यम प्रमाणात होणारा हा पाऊस मुख्यत्वे विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम व दक्षिण महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे. २७ एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडेल. २८ एप्रिल रोजी विदर्भात, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडेल. २९ आणि ३० एप्रिल रोजी संपुर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. तर दुसरीकडे कोरोनाचा कहर सुरु असतानाच २०२० या वर्षातील पहिले चक्रीवादळ बंगालच्या खाडीत उठण्याची शक्यता आहे. अंदमानाच्या समुद्रात २७ एप्रिल रोजी याची चिन्हे दिसण्याची शक्यता आहे. २४ तासांत येथे निर्माण झालेल्या चक्रवाताचे कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतरण होईल. आणि यास हवामान पूरक असल्याने २९ ते ३० एप्रिल या काळत कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर आणखी वाढेल. आणि १ मे रोजी २०२० या वर्षातील पहिले चक्रीवादळ अंदमानच्या समुद्राच्या उत्तर भागावर निर्माण होईल. याचा परिणाम म्हणून अंदमान, निकोबार येथे वेगाने वारे वाहतील. पाऊस कोसळेल. हे चक्रीवादळ पुढे सरकत बंगालच्या खाडीवर येईल. भारताच्या किनारी येईपर्यंत चक्रीवादळाचा जोर आणखी वाढेल. मात्र आतापर्यंत मिळलेल्या संकेतानुसार, चक्रीवादळाचा मार्ग बदलण्याची शक्यता असून, हे चक्रीवादळ म्यानमार आणि बांग्लादेशच्या दिशेने रवाना होईल.

----------------------------

- भारतात प्री-मान्सून हंगाम मार्चपासून जूनपर्यंत सुरु राहतो. याच काळात चक्रीवादळाचा हंगामही सुरु होतो.

- जून महिन्याकडे पावसाचा महिना म्हणून पाहिले जात असले तरीदेखील याच महिन्यात हवामानात महत्त्वपुर्ण बदल होतात. एकीकडी प्री-मान्सून हंगाम संपत असतानाच दुसरीकडे मान्सूनचे आगमन होत असते.

- जून महिन्यातदेखील चक्रीवादळे येत असतात. २०१० पासून २०१९ पर्यंतच्या १० वर्षातील आकडे पाहिले तर एप्रिल महिन्यात अरबी समुद्रात एकदाही चक्रीवादळाही निर्मिती झालेली नाही.

- जून महिन्यात एकदाही बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा निर्मिती झालेली नाही. मात्र मे महिन्यात बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात गेल्या दहा वर्षांत ४-४ चक्रीवादळाची निर्मिती झाली होती.

- सध्याच्या दशकात चक्रीवादळाच्या हंगामात ज्या चक्रीवादळाची निर्मिती झाली; त्याचे नाव मारुथा होते. आणि त्याचे असित्त्व फार कमी होते. हे चक्रीवादळ १५ एप्रिल २०१७ रोजी उठले होते. २४ तासांतच त्याचा जोर ओसरला होता.

Web Title: Mercury forty, hurricane and unseasonal rain hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.