व्होकेशनलच्या विलीनीकरणाने विद्यार्थी पालक संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:07 AM2021-02-12T04:07:10+5:302021-02-12T04:07:10+5:30

मुंबईतील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई शहर, उपनगर मिळून ३२ तुकड्यांचे आयटीआयमध्ये विलीनीकरण होणार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एकीकडे ...

The merger of Vocational confuses student parents | व्होकेशनलच्या विलीनीकरणाने विद्यार्थी पालक संभ्रमात

व्होकेशनलच्या विलीनीकरणाने विद्यार्थी पालक संभ्रमात

Next

मुंबईतील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई शहर, उपनगर मिळून ३२ तुकड्यांचे आयटीआयमध्ये विलीनीकरण होणार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एकीकडे व्यवसाय अभ्यासक्रमाचा गवगवा केला जात असताना, दुसरीकडे मात्र उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमावरच (व्होकेशनल) सरकारने फुली मारली आहे. केंद्र सरकारकडून मिळणारे अनुदान बंद झाल्याने हा अभ्यासक्रम औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) विलीन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता दहावीनंतर या व्होकेशनल अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची दारे बंद होणार आहेत. विद्यार्थ्यांचे एका ट्रेडमधून दुसऱ्या आयटीआयच्या ट्रेडमध्ये विलीनीकरण होत असल्याने त्यांचे शिक्षण थांबणार नाही व नुकसान होणार नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून दिली जात असली तरी विद्यार्थी व पालकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमासाठी केंद्र सरकारकडून अनुदान मिळत होते. मात्र, १९९७-९८ पासून ते बंद करण्यात आले. त्याचबरोबर नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्कशी (एनएसक्यूएफ) संलग्न नसलेल्या अभ्यासक्रमांनाही अर्थसाह्य देणार नसल्याचेही केंद्र सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. केंद्राचे अनुदान बंद झाल्याने हा डोलारा सावरायचा कसा, असा प्रश्‍न राज्य सरकारपुढे उभा राहिल्याने विलीनीकरणाचा मार्ग स्वीकारण्याची भूमिका घेतली आहे. राज्य सरकारने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून शासकीय संस्थांमधील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश देऊ नये, असे स्पष्ट केले असून, अभ्यासक्रम टप्प्याटप्याने बंद होणार आहे. मात्र, या निर्णयाचा सर्वाधिक फटका शिक्षकांसह संस्थाचालकांना बसणार असल्याचे व्होकेशनल टीचर्स असोसिएशनने म्हटले आहे, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फटका बसणार असल्याच त्यांचे म्हणणे आहे.

मुंबई विभागातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई शहर, मुंबई उपनगरातील एकूण ३२ ट्रेडचे विलीनीकरण आयटीआयमधील इतर ट्रेडमध्ये करण्यात आले आहे. येथे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा ट्रेड कायम ठेवण्यात आल्याने त्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, उलट त्यांना आयटीआयचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर मिळणार असल्याची माहिती आयटीआयचे संचालक दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी दिली.

......

कोट

एमसीव्हीसीपेक्षा आयटीआयला जास्त मागणी

आयटीआयची प्रवेश क्षमता वाढेल, एमसीव्हीसीपेक्षा आयटीआयच्या विद्यार्थ्यांना जास्त मागणी आहे. जिल्ह्यातील व राज्यातील शासकीय तंत्र माध्यमिक शाळा, केंद्रातील अभ्यासक्रम तेथील आयटीआयमध्ये रूपांतरित होतील. यामुळे त्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची प्रवेश क्षमता वाढेल.

-दीपेंद्र सिह कुशवाह, संचालक आयटीआय

..... ....

कोर्सला नोकरीची जोड हवी

एमसीव्हीसी कोर्स व्यावसायिक अभ्यासक्रम आहे, आयटीआयमध्ये विलीनीकरण करून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असे शासन संगत असेल, तर नोकरीची हमीही यातून हवी. अनेक विद्यार्थ्यांना लगेच नोकरी मिळवून देणारा अभ्यासक्रम शासनाने बंद करण्याएवजी या कोर्सला नोकरीची जोड कशी देता येईल, याचा प्रयत्न शासनाने करायला हवा.

-विराजस खंदारे, विद्यार्थी

..... ....

जिल्ह्यातील व्हॅकेशनलअंतर्गत बंद करण्यात आलेले अभ्यासक्रम

- कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी

- इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी

- ऑटोमोबाइल टेक्नॉलॉजी

- इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी

- मेकॅनिकल टेक्नॉलॉजी

------

मुंबई विभागातील एकूण बंद होणाऱ्या अभ्यासक्रमाच्या तुकड्या- ३२

मुंबई शहरातील संख्या- ३

मुंबई उपनगरात एकूण संख्या- ९

Web Title: The merger of Vocational confuses student parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.